Kitchen tips for housewives, Read Kitchen tips for housewives, how to manage your home and kitchen, from kitchen to world. some kitchen tips that helps a housewife to some extend
* सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात एक दोन उकडलेले बटाटे एकदम मउ करून घालावे.
* जाम, वै बनविण्यापूर्वी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डालडा लावून घ्यावा म्हणजे करपण्याची भीती राहात नाही.
* भजी बनविताना त्यात थोडा भिजवलेला साबुदाणा कुस्करून घ्यावा भजी छान लागतात.
* लोणी कडविताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्ह्णजे तूप कणीदार होते.
* दहीवड्या करीता दही बनविताना त्यात एक बटाटा उकडलेला मउ करून घालावा. चव छान येते.
* कचोरीचे सारण करताना बेसन भाजून घालावे म्हणजे,सारण खमंग लागते.
* कोणताही सूप करताना त्यात पुदिना, कडीलिंबाची पावडर टाकावी उत्तम वास येतो.
* दुधीभोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे. भाजी अत्यंत चवदार होते.
* फ्लावरची भाजी शिजताना त्यात थोडे दुध घालावे म्हणजे फ्लावरचा रंग बदलत नाही.
* पाले भाजी करताना हिरवीच राहण्या साठी भाजी फोडणी नंतर भाजी सोडल्यावर चिमुट भर खाण्याचा सोडा घालावा.
* डोसा कुरकुरीत होण्या साठी डाळ भिजवतानाच थोडी तुरीची डाळ व मेथी दाणे भिजत धालावे.
* कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब भुईमुगाचे तेल घालावे व मग शिजवावे.
* अंडे उकडताना त्यात किंचीत मीठ घालावे म्हणजे कवच अलगद निघते.
* बटाटे उकडताना त्यात थोडे मीठ घाला म्हणजे फुटणार नाहीत.
* लायटर थोडा बंद पडला असल्यास त्याला एक दिवस फ्रीज मध्ये ठेवा पुन्हा सुरु होईल.
* नॉन स्टिक तवा चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा टाक लावा.
* राजगिरा, मोहरी, तील हे वापरन्यापुर्वी स्वच्छ धुवून उन्हात वाळवावे. व कोरड्या डब्यात ठेवावे.
* पापड, लोणची, मुगवडया वै. बनविताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे टिकाऊ होतो.पदार्थ अधिक चविष्ट बनतो.
* मध गोठ्ले असल्यास बाटली गरम पान्याच्या भांड्यात ठेवावी.
* फ्रुट सॉलड ,दुध वा अन्य कोणतही शर्बता मध्ये मध टाकल्यास चव चांगली लागते व शक्तिवर्धक होते.
* खोबर्याच्या वाट्या खौट होऊ नये,म्हणून ते मिठाच्या पाण्यात काही काळ भिजत ठेवाव्यात नंतर वाळवून ठेवाव्यात.
* नारळ फोडण्या आधी धुवून घ्यावे.
* सफरचंद, पेरूच्या फोडी लवकरच काळ्या पडतात त्या काळ्या पडू नयेत त्यासाठी थोडा लिंबू रस लावून ठेवावा.
* लिंबाचा रस काढावयाचा असल्यास प्रथम ते जमिनीवर हलक्या हाताने दाबून फिरवावे.नंतर रस काढावा रस भरपूर निघतो.
* वर्ष्याच्या साठवणीचे तिखट लाल भडक रंगाचे व टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतून नंतर कडक उन्हात वाळवत ठेवाव्या व नंतर दळाव्यात.तिखट ठेवताना त्यात मध्ये मध्ये थोडे मीठ भुरकावे.
* प्लास्टिक भांडया वरील किंवा कपबश्या वरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावेत. त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे.Source : Marathi Unlimited.