राष्ट्रपती प्रणवदाच होणार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला वेगळे वळण


वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करताच त्यांच्या नावाला वाढता पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) आणि डाव्या पक्षांसह इतर विरोधी पक्षांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांनाही मुखर्जी यांचा सव संमतीचा उमेदवार म्हणून नाईलाजाने स्वीकार करावा लागेल. २३ जूनला प्रणव मुखर्जी वित्तमंत्रीपदाचा राजीनामा देतील व त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे २५ जून रोजी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरतील, असे समजते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या ‘युपीए’मधील घटकपक्षांच्या एक तासाच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी प्रणवदांची उमेदवारी जाहीर केली. मुखर्जी यांच्या नावावर व्यापक सहमती असून सर्व राजकीय पक्ष तसेच खासदार व आमदारांनीही त्यांच्या नावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचे नावही काही पक्षांनी जोरदार चर्चेत ठेवले होते. परंतु युपीएच्या उमेदवाराला इतरांच्या पाठिंबा धरून ६0 टक्क्यांपर्यंत मते मिळू शकतात, असे चित्र स्पष्ट झाल्याने कलाम यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचे रात्री स्पष्ट केले. एनडीए अणि डाव्या पक्षांनी मुखर्जींना पाठिंबा द्यायचा नाही, असे म्हटले तरी प्रतिस्पर्धी उमेदवार शोधण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे फार तर उपराष्ट्रपदासाठी ‘बार्गेनिंग’ करून अखेर एनडीएही मुखर्जींना पाठिंबा द्यायला तयार होईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

Source : Online.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा