शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदावर बिगर राजकीय व्यक्तीला बसविण्याचे आवाहन केल्यानंतर मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुन्हा राष्ट्रपती करण्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेसनेही पवारांचाच सूर आळवला असून, समाजवादी पक्षाने डॉ. कलाम यांच्या नावाला पसंती दिल्याने उमेदवार निवडीच्या चर्चेला वेग आला आहे.
1) राष्ट्रपतीपदासाठी केवळ ‘सर्वमान्य’ उमेदवार निवडण्याचे आवाहन केले होते. त्यात उमेदवार बिगर राजकीय असावा, असे कुठेही म्हटलेले नाही.
– शरद पवार
2) डॉ. कलाम हे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. राष्ट्रपतीपदी कलाम यांनी चांगले काम केले आहे.