If you want Marathi suvichar, Marathi vichar dhan, Marathi akshar Manch them read this. great collection of thoughtful suvichar. Quotes of all Famous Indians.
सुविचार —
* आळसा सारखा शत्रू नाही,– आत्मविश्वासा सारखा मित्र नाही.
* कार्यमग्नता हि मानवी जीवनाची अटळ आशी व्यवस्था आहे.
* गणिताच्या अरण्यातून जाताना सूत्रांची बंदुक हाती घ्यावीच लागते.
* कामक्रोधांना आपापसात लढवून मारणे यातच ज्ञानाचे खरे कौशल्य आहे.
* कर्तुत्वाची भरारी मानसालां अमरत्व मिळवून देते.
* जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.
* अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे.
* आवड असली तरच सवड मिळू शकते.
* उपदेशक व्हा, विचारवंत व्हा, पण अगोदर आचारवंत व्हा.
* अभ्यास आणि कष्टामुळे असाध्य गोष्ठी सहज साध्य करता येतात.
* ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास कधीच वाटत नाही.
* दुसरयाची अंत:करणे उघडण्याची किल्ली म्हणजे सहानुभूती होय.
* तुम्हाला जे हवे असेल ते हसत मुखाने मिळवा.
* आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
* घरच्या आईची किमत कळायला स्वत:घरा बाहेर पडावं लागतं!.
* अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
* चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो, – तर बुद्धीचा विकास एकांतात होतो.
* उष:कालाकडे जाण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे रात्र.
* उधोगी माणूस क्वचितच निर्धन असतो.
* प्रेम हि निसर्गाची खरी प्रेरणा आहे.
* ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते, त्यांना प्रत्येक गोष्टींची कमतरता असते.
* खाजगीत कान उपटा परंतु चौघात कौतुकच करा.
* गरिबी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टींना जन्म देते.
* कृती चटका लावणारी असावी, देणारी नको.
* चारित्र्यात सूर्याची तेजस्विता, अन अंत:करणात चंद्राची शीतलता असावी.
* जीवन म्हणजे सुख- दुखा:च्या उनपावसाचा खेळ आहे.
* जीवन फुलासारखे असू द्यावे, पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणे ठेवावे.
* जो मूळचाच सदगुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.
* जो ओरडतो त्याला अंत:करण असते.
* जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.
* जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरविते.
Source : Marathi Unlimited.
2 Comments. Leave new
Khup chan suvichar ahet also read Marathi Attitude Status
Suvichar