Rain Rose Films:
The Marathi industry with its strong story telling has time and again proved its mettle. SAIRAT that released in April 2016 became a rage like nothing and went on to make more than a 100 crore and not just made money for its makers; it had the critical acclaim and audiences acknowledging too. Are we seeing a similar buzz around the upcoming Sandeep Kulkarni Suyog Gorhe starrer KRUTANT…
For starters, the industry insiders, trade & analysts who have had a dekko at KRUTANT have positively hinted that KRUTANT has all the potential to repeat the feat of being a blockbuster. A film distributor in the know of things has seconded the thought and is eagerly awaiting the release of the film. Commenting strongly on the narrative of the film, its meaningful dialogues and now the icing on the cake with a peppy promotional dance number that itself has become an anthem “Thamb Kinchit Thamb’ for workaholic millennial.
Checkout the theatrical trailer to believe… Thamb Kinchit Thamb (take a break from your daily chores) and stay tuned for more on KRUTANT. Directed by debutant Datta Mohan Bhandare, Produced by Miiheer Shah, KRUTANT features Sandeep Kulkarni, Suyog Gorhe, Sayli Patil in pivotal roles. The film releases this 18th January.
सैराट नंतर कृतांत?
मराठी चित्रपटसृष्टीच्या दमदार कथाकथनाच्या परंपरेला सार्थ ठरवणारे अनेक चित्रपट आजपर्यंत आपण पाहिले. एप्रिल २०१६ ला आलेल्या ‘सैराट’ने १०० करोड पार करून आजपर्यंत कधीही न घडलेला इतिहास घडवला. आज दोन वर्षांनंतरही ‘सैराट’ची जादू कायम आहे. अशी किमया सध्या जर कोणत्या चित्रपटातून दिसत असेल तर तो आहे, संदीप कुलकर्णी आणि सुयोग्य गोऱ्हे अभिनीत ‘कृतांत’ हा आगामी थरारपट!
चित्रपट समीक्षक आणि अभ्यासकारांच्या मते, ‘कृतांत’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमाकूळ घालेल यात शंका नाही. जाणकार सिनेवितरक या चित्रपटाची मनापासून वाट पाहात आहेत. ‘कृतांत’च्या आगळ्यावेगळ्या कथेसॊबतच अर्थपूर्ण संवाद आणि सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेलं ‘थांब किंचीत थांब’ हे गीत जनमानसात ‘आपलं गीत’ म्हणून प्रसिद्ध होतंय.
याची अनुभूती घेण्यासाठी हा ट्रेलर आणि ‘थांब किंचीत थांब’ हे गीत पुन्हा एकदा बघा. दत्ता मोहन भंडारे यांचं दिग्दर्शन, मिहीर शाह यांची निर्मिती असणाऱ्या या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी, सुयोग्य गोऱ्हे आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘कृतांत’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा येत्या १८ जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. नक्की बघा!