One of the key decisions a couple needs to make in a marriage is about lifestyle. Ultimately, a lifestyle represents a set of choices driven by underlying values—the way we choose to use our financial resources and time. And if spouses do not reach agreement on this issue, conflict will be a daily feature of their relationship.
For more information kindly read below article.
दाम्पत्य जीवन
मनुष्याला जेव्हा एक अत्यन्त आत्मीय आणि जन्मभराच्या साथीदाराची आवश्यकता भासते. तेव्हा तो लग्नकरीत असतो. अनेक कमतरता दुरबलता आणि त्रुटींना पार करून जी मैत्री अक्षुन्न असते. तिलाच विवाह असे म्हणतात. तसे तर मनुष्याला जन्मभर मित्र मिळत असतात. ती मैत्री तुटतात. आणि काही काळात मनुष्य विसरून जातो. त्या मैत्रीत काही तरी स्वार्थ जुळलेला असतो. म्हणून त्या जुळतात आणि तुटतात. परंतु आयुष्याचा साथीदार बनविण्या करिता धर्मानुष्ठानाच्या साक्षीने केलेली किंवा जुळवून आणलेली मैत्री म्हणजेच लग्नहोय. !यात निस्वार्थ भावना असते. ती आत्मत्यागाने पोषित झालेली असते, प्रेमाने सिंचितपल्लवीत व पुष्पित झालेली असते. अशीच भावना जन्मभर कायम राहिल्यास दाम्पत्यजीवनात सुख शांती आणि आंनद बहरिल राहील.
सुखी दाम्पत्य जीवनाकरिता मुबलक पैशाची आवश्यकता असते. असे कितीकांना वाटत असते. सुख -सोयीची साधने भरपूर असतील तर मनुष्य दिर्ध काळपर्यंत त्या लालाभ घेऊ शकतो, परंतुआज वास्तविकता हि आहे किधन-संपत्तीच्या अभावामुळे दुखीवक्लांत विवाहित जीवन जगत असल्याची उदाहरणे फारकमी आहे. पैशाच्या अभावामुळे उत्पन्न होणाऱ्या किवूटुंबिक विवशतात्रासदेत असतात ,हे खरे असले तरी दाम्पत्य जीवन जर मधुर असले तर हा त्रास कमी अनुभवास येतो. पती-पत्नी मधील प्रेम अशा त्रासांच्या जखमेवर मलमाचे कार्य करीत असते. मात्र श्रीमंत लोकांचे विवाहित जीवन लग्नानन्तर लवकरच निरस आणि आंनद रहितहोत असल्याचे आजकाल दिसून येत आहे. पती पैसे मिळविण्यात इतका मग्न झालेला असतो. कित्याला पत्नीशी दोन शब्द बोलण्याची सवड नसते. हे पत्नीला सम्पत्ती किंवा ऐशवर्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचे वाटत असते. मग सगळं आक्रोश तीत्या पती किंवा सासरच्या इतर लोकांवर काढत असते. याचा परिणाम मग कुटुंबात कडवट पणा आणि दुरावा निर्माण होत असतो.
वैवाहिक जीवन सुखीव राहण्ययाकरिता पती-पत्नी सुशिक्षित असायला हवे असाकाही लोकांचा समज असतो शिक्षणामुळे वैवाहिक जीवनात सरसता किंवा नीरसता या दोघान्चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. परंतु कोट्यवधी लोक अशिक्षित असून सुद्धासुखी व आंनदी वैवाहिक जीवन जगत आहेत. या उलट लाखो सुशिक्षित जोडपी संसाराचा ताळमेळ जमत नसल्या कारणाने तणावपूर्ण वैवाहिकजीवन जगत आहेत. असे निदर्शनास येते.
वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी पैसे आणि शिक्षण या दोन्हीची आवश्यकता असते. या मुळेजीवनात अनेक सुख सोयी प्राप्त होऊ शकतात. परंतु आंनद प्राप्त करणे हे तेवढेच कठीण आहे.
आंनद प्राप्त करण्याकरिता पती-पत्नीच्या शरीरातवास करीत असलेल्या व दोन आत्म्यांना एका सूत्रामध्ये आबद्धकरणाऱ्या गुणांची आवश्यकता असते. हे म्हणजेच एकमेकांबद्दल असलेले प्रेम, आत्मीयता, स्नेह, त्याग, परीमार्जीत भावना व परीमार्जीत दृष्टिकोन, हे सर्व होत. प्रेम हे पती-पत्नीला बांधून ठेवणारे सूत्र होय. एवढेच नव्हे तर आत्मोत्सर्ग, त्याग आणि निस्वार्थ भावनेला सुद्धा जन्मदेत असते. एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेऊन दुसऱ्याच्या सुखसोयी करिता स्वतःच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष केल्यानेच या प्रेमाच्या अमृताचा वर्षाव होत असतो. आणि एकमेकांच्या करिता आत्मदान देण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. तेव्हा कमी संपत्तीतही कमी शिक्षण असून सुद्धा ते तिथे गरिबीची पर्वा नकरता हसत-खेळत जीवनाची गाडी मधुर तेने पुढे नेट असतात.
अशिक्षित आणि गरीब जोडप्यांमध्ये जो स्नेह, आंनद आणि जे जीवन-संगीत दृष्टिगोचर होत असते, ते त्यादिव्यप्रेमाचीच स्वरूप असते.
भारतीय कुटुंबातील मुलींना सुदैवाने हि भावना वारसाच्या रूपानेच मिळत असते, आणि त्या भावनांच्या बळावर आपल्या पतीच्या सर्वस्वाच्या त्यास्वामींनी बनत असतात.
आधुनिककुटुंबाच्या दाम्पत्य जीवनमधील आनंदाचा झरा आटण्याचे कारण म्हणजे भावनांची कमतरता नसून स्वतःच्या स्वार्थाला व अहंकाराला अधिक महत्व देणे हेच होय. अश्या दाम्पत्य जीवनात आत्मियता कमी आणि व्यवसायिकता जास्त असते. म्हणूनच आधुनिक अतिशिक्षित कुटुंबातील वैवाहिक जीवन फारच तणावपूर्वक असल्याचे दिसून येते. स्वतःच्या स्वार्थाची व अहंकाराची पूर्तता होण्याच्या मार्गात जेव्हा अड्थडे निर्माण होताना दिसतात तेव्हा दाम्पत्य सुखातही कमतरता येऊ लागते.
प्रगाढ प्रेमाचा आत्मा म्हणजे – आत्म दान होय. आत्मदानी लोकांना इतरांच्या आवश्यकतां पुढे स्वतःआवश्यकता तुच्छ वाटू लागतात. जोडीदाराच्या सुखसोयींनी काळजी घेणे, हाच त्यांना धर्म वाटतो. एकमेकांच्या संगतीत जगण्याची व मरण्याची दृढभावना त्यांच्या हृदयातवास असते.
एकमेकांवरील विश्वास हा दाम्पत्य प्रेमाचा प्राण असतो. पती-पत्नीचे एकमेकांवर प्रगाढ प्रेमा असावे लागते. त्यात दुरावा व लपवालपविला मुळीच स्थान नसते. कारण लपवालपवीच्या या खेळात शन्काकुशन्का यांना स्थान प्राप्त होऊन सफल जीवनात बाधा निर्माण होऊ शकते. म्हणून मोकळ्या मनाने एकमेकांशी बोलून आपल्या शन्का दूर करणे हाच एकमेव मार्ग असतो.
दुरावा आणि लपवलपवी हि दाम्पत्य जीवनात शन्केचे वातावरण निर्माण करून बाधाकरत असते.
सर्वोत्तम वैवाहिक जीवन करिता भावनांचे फार महत्व असते. पती-पत्नीयांनी एकमेकांशी कर्तव्यनिष्ठ आणि सदभवना पूर्ण असावे. यालाच भवनात्मक परिष्कार असे म्हणतात. पुरुष्यात पुरुषत्वाचे गुण असायलाच हवे. आणि स्त्रीमध्ये स्त्रीतत्वाचे गुण असायला हवे. म्हणजे वैवाहिकजीवनात आनंदाचा प्रवाह आपोआपच सुरु असतो. पुरुषत्वम्हणजे शक्ती, साहस, सक्रियता, आणि नियमितता. स्त्रीतत्व म्हणजे कोमलता, मृदुता, दयाळूपणा, स्नेह, सौम्यता, आणि सहानुभूती. हे गुण पती-पत्नीच्या पूर्ण रुपाने विद्यमान असणे आवश्यक आहे. आणि हे लक्षात घ्यावे कि चुका या प्रत्येक कडून होतात च, त्यावरून एकमेकांना झिडकणे, अपशब्द बोलणे किंवा सहाव्या श्राप देणे हे मूर्खतेचे चिन्ह आहे. याही गोष्टी लक्षात घ्याव्या, यामुळे दाम्पत्य जीवनाच्या वृक्षाची मुळेहळू-हळूकापल्या जातात आणि कधी वुक्ष तुटून पडेलह्याची कल्पना नसतेत्या मुळे बऱ्याच बारीक गोष्टी मुळे उगाच गैरसमज होऊन ये हिदक्षता घ्यावी.