Gemstone :-
Gemstone are also called gem, jewel or precious or semi-precious stone. This are the piece of mineral crystal which are used to make jewelry. There are also organic resources or precise rocks that are not minerals (for example jet or amber) that are also used for jewelry and would also be considered to be gemstones, as well. In the West, precious stones are diamonds, sapphires, rubies and emeralds. All other stones are considered semi-precious stones. Read More…
रत्न कार्नेलीयन ::
मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आणि उत्कर्षासाठी कार्नेलीयन हे रत्न उपयोगी पडते. एखाद्या स्थित्यंतरा हवी असलेली शांतता, बुद्धीमत्तेला हवी असलेली संधी, आत्मविश्वास, उत्तम वक्तृत्वशैली या सगळ्यांसाठी कार्नेलीयनचा उपयोग होतो. दु:ख, ताणतणाव ,खिन्न आणि वैफल्यग्रस्त अवस्था तसेच मनाची घालमेल या सगळ्यांवर या खड्याचा शुभ परिणाम दिसून येतो. सगळ्या दुष्ट शक्ती आणि दुष्ट विचारांना हा खडा दूर ठेऊ शकतो. याला ‘आत्म’ सन्मानाचा खडा असे म्हटले जाते. आणि तीच त्याची खरी ओळख आणि उपयुक्तता आहे. निर्मिती जननेंद्रीयांची क्षमता यावर या खड्याचा अनुकूल परिणाम दिसून येतो. पोटाच्या खालच्या भागावर हा खडा आरोग्यवर्धक परिणाम घडवून आणतो. ज्या लोकांना मुल होत नाही,वंध्यत्व आहे त्यांनी कमरेखाली करदोड्यात बांधल्यास त्याचा चांगला उपयोग दिसून येतो. याच बरोबर नैराश्य संधिवात, दमा, कातडीचे सर्व प्रकारचे रोग, रक्ताभिसरन, निद्रा नाशाचे विकार,मुरमे फुटकुळ्या या सर्वावर हा खडा विलक्षण गुणकारी ठरतो.
( कि. पेंडन्ट रु. ३०० पासून )
हा खडा अनेक रंगात उपलब्ध होत असला तरी त्याचे मोळी तितकेच आहें. भारतात सापडणारा काळा टुर्मेलिन मात्र अगदी कमी किमतीत उपलब्ध होतो, आपलें मन स्वास्थ्य कोणत्यातरी बाह्य नकारात्मक गोष्टींमुळे हरवले आहें असे वाटत असेल तर हे रत्न जरूर वापरावे. नकारात्मक उर्जा दूर करून सकारात्मक उर्जा प्रवाहित करणारे आणि नकारात्मक गोष्टीं पासून बचाव करणारे हे उपरत्न कोणीही वापरण्यास हरकत नाही. टुर्मेलिन मुळे ‘नजर लागणे’ – ‘घात-अपघात ‘ अशा गोष्टीं पासून रक्षण होते. दुर्घटने पासून रक्षण करणे हे या रत्नाचे मुख्य कार्य आहे. सर्व त्रास कष्ट स्वत: घेण्याची याची क्षमता आहे. टुर्मेलीन चा मोठा खडा कुठलीही ऋण उर्जा शोषून घेत असल्याने ऑफीसातल्या दर्शनी भागात वा घरात पहिल्या खोलीत दिसेल असा ठेवल्यास याचा नक्कीच फायदा होतो. ‘शांतीदूत ‘ असलेला हा खडा सर्व शरीर शुद्धी करून ताणतणाव नाहीसे करतो. सर्व प्रकारचे कोड, त्रिदोष, पोटाचे रोग, ज्वर, श्वास, क्षय, प्रमेह, वीर्यदोष, इ. च्या निवारणासाठी सहाय्य करतो.
(पेंडट कि. १५० पासून, खडा १०० रु पासून )
या नावाचा उगम हा ऑंमेथेंस्टेस या ग्रीक शब्दाने आहे. याचा अर्थ आहे न प्यायलेला, थोडक्यात सांगायचे म्हणजे स्व: त वर नियंत्रण मिळवून येणारा, आजच्या जगात दुर्मिळ होत चाललेली मन:शांती देणारा. असा हा खडा आहे. याचे नाव ‘जांभ्या’ किंवा ‘कटेला’ असेही आहे. माणसाच्या हातून वाईट कृत्ये टाळायला याचा चांगलाच उपयोग होतो. चांगल्या कार्यासाठी किंवा मन परिवर्तन घडवून आणण्याची किमया या खड्यामध्ये आहे. दारूचे व्यसन सुटण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होतो. व्यसनाधीनते पासून सुटका आणि विसाळूपणावर विजय या गोष्टी यापासून साध्य होतात. ज्या ठिकाणी वारंवार संघर्ष होतात अश्या कुटुंबांमध्ये याचा वापर हा शांतीसाठी अतिशय प्रभावशाली ठरतो.द्वेष, ईर्ष्या, मत्सर यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी धारणकर्त्याला हा खडा पूर्णत: मदत करतो. मानसिक शांती, समाधान, आणि शांत झोप लागणे या तिन्ही साठी हा खडा जरूर वापरावा. औदासिन्य, ढळलेली मन:शांती , ताण, उद्विग्नता या सगळ्यांवर हा खडा प्रभावी कार्य करतो. आत्मशक्ती, मज्जासंस्थाचे विकार, रक्तविकार आणि रक्तातली साखर या सगळ्यावर या खड्याचा वापर गुणकारी ठरतो. हा खडा एक पेलाभर पाणी टाकून ठेवला आणि ते पाणी पिण्यासाठी वापरले तर, अर्धशिशी, सांधेदुखी, दातदुखी, यांपासून आराम मिळू शकतो. स्त्रीयांना मासिक पिरीयेड मध्ये होणारा त्रास या पाण्याने कमी होतो.
( कि. पेंडन्ट रु. १५० पासून )
रत्न सुजीलाईट ::
एखाद्या गोष्टीच्या त्रासापासून सुटका करायला, बरे व्हायला हा खडा मदत करतो. यातील गडद रंग अति प्रभावी मानला जातो. चंचलता, भावनाप्रधानता,हळवेपणा, चटकन दुखावले जाणे, अतिसंताप, जगाविषयीचा तिटकारा,उदासीनवृत्ती या सर्वांवर हा खडा परिणामकारक ठरतो. भावनेच्या आहारी न जाऊ देण्याची ताकद या खड्यात दिसून येते. दुसर्यांचे रक्षण करणे, आणि क्षमाशीलता या गुणांचीही वाढ या खड्यामुळे होते. भ्रूमध्यावर हा खडा ठेवल्यास डोकेदुखी वा अर्धशिशी पासूनही सुटका होऊ शकते. हा खडा योग्य पद्धतीने वापरल्यास अनेक घातक आणि हानिकारक अस्या सवयीपासून सुटका होऊ शकते. लैंगिक विकारांवरही हा खडा प्रभावीपणे काम करतो.ऑमेथिस्ट बरोबर याचा वापर हा जास्त परिणाम कारक ठरतो.
( पेडन्ट कि. रु. ५०० पासून )
रत्न टरक्वाईझ ::
आज अनेक साधनांमुळे संवाद साधने सुलभ झाले आहे. मात्र मानसिक पातळीवरचा संवाद हा हरवत चाललेला आहे. त्यासाठी हा खडा वापरणे हे सुस्वास्थ्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी आवश्यक ठरते निळसर हिरव्या वा गडद हिरव्या रंगात प्रामुख्याने तो उपलब्ध होतो. आणि यावर पांढरा डाग असल्यास हा खडा अति शुद्ध मानला जातो. या खड्याचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो कुठलेही संकट स्वत: वर घेतो. एखादी मोठी आपत्ती येणार असल्यास हा खडा स्व:त तुटतो; पण धारण करणाऱ्यास वाचवितो. अशी याची ख्याती आहे. धारण करणाऱ्याला आजार असेल तेव्हा त्यानुसार त्या खड्याची रंगथटा आणिक अधिक फिकट वा दाट अशी बदलत असते. आपली तब्येत शारीरिक या भावनिक पातळीवर ठिकठाक आहे कि नाही याचा हे उपरत्न म्हणजे आरसाच आहे. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी यांची जोडी तुटू नये ते विभक्त होऊ नयेत या साठी या खड्याचा प्रभावी उपयोग करून घेता येतो. वधू- वरांचे लवकर योग येण्या साठी देखील या खड्याची मदत होते. मैत्री संबंधात याचा चांगला परिणाम दिसून येतो.
( पेडन्ट कि. रु. ४५० पासून )
रत्न अंबर ::
अंबर ची गणना रत्नां मध्ये होत असली तरी ते वनस्पतीजन्य आहे. हजारो वर्ष्यापूर्वी अश्मीभूत झालेल्या विशिष्ट वृक्षांशी संबंधित असणारे हे रत्न साहजिकच पृथ्वी तत्वाशी घट्ट नाते सांगणारे आहे. विलक्षण उर्जा आणि शुद्धीकरणाची ताकद असलेला खडा शरीरातील आजाराचे मुळापासून निवारण करण्यास सहाय्यक ठरतो. एवढेच नव्हे तर त्याच्यात पुनरुज्जीवनाला चालना देण्याचीही क्षमता आहे. नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेत परावर्तन व शरीराची रोगनिवारण क्षमता वाढविण्याचे काम हा खडा करतो. अंबर स्थैर्य प्राप्तीसाठी उपयोगी ठरत असला तरी त्या बरोबर इच्छित प्राप्तीसाठी प्रेरित करण्याचे कामही तो करितो. एखाद्या व्यक्तीला नैराश्याचे झटके येत असतील तर अंबर धारण करण्यास सांगितले जाते, कारण नैराश्य दूर करून जीवनेच्छा निर्माण करण्यासाठी हा खडा सहाय्यक ठरू शकतो. संतुलन आणि संयम यात वाढ करून विरोधावर मात करण्याची क्षमता देणारा खडा निर्णयक्षमता देखील वाढवितो, मानसिक शांती, विश्वासाची भावना विकसित होण्यास सहाय्यभूत ठरतानाच, शहाणपणा, बुद्धीचातुर्य यांसाठीही अंबर उपयुक्त ठरतो.
रत्न लॉपिस लाझूली ::
याचे मराठी नाव आहे ‘लाजावर्त’ याचा रंग प्रामुख्याने निळा असल्यामुळे याचे स्वामित्व शनी ग्रहाकडे असल्याचे मानतात. शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यबळ आणि बुद्धी या दोन्ही साठी याचा उपयोग होतो. भूतबाधा, सर्पदोष यांपासूनही मुक्ती मिळविण्यासाठी याचा वापर केला जातो. कुणाचीही नजर लागू नये यासाठी याचा प्रभावी वापर होतो. शरीरातील पित्तविकारावर तसेच पंडूरोग, क्षयरोग, यावर हा खडा अतिशय गुणकारी आहे. शरीरातला आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. मनाने दुर्बल असलेल्या व्यक्तींना सक्षम आणि सामर्थ्यवान बनविण्यासाठी या खड्याला धारण करण्याचा सल्ला दिला जातो. परस्पर संबंधातली विश्वासार्हता टिकून राहण्यासाठीही याचा उपयोग होतो. हे रत्न रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी त्याने डोळे धुतल्यास डोळ्यांवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि दृष्टीही सुधारते. माणसाचे अंर्तमनातील नाते जोडायला आणि त्यायोगे बाह्य जगाशी प्रभावीपणे संवाद साधण्यास हे रत्न मदत करते.
( पेंडन्ट किं. रु. ३०० पासून )
रत्न मूनस्टोन ::
भावनिक संतुलन हे याचे मुख्य कार्य मानले जाते. भावनिक दृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी याचाच उपयोग करतात. ज्यांना आपल्या भावना व्यक्त करणे फार अडचणीचे वाटते अश्यांनी मूनस्टोन चा वापर करावा असे सांगितले जाते. हा खडा प्रेम भावना वृद्धिगत करणारा मानला गेला असला तरी ‘स्व’ प्रचीती आणून देण्याचे गुणधर्मही त्याच्यात आहेत. त्यामुळेच अनेकदा ध्यान धारणा करताना मूनस्टोन सहाय्यक ठरत असल्याचे दिसून आलें आहे. आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वाचा खडा म्हणूनही तो ओळखला जातो. हा खडा प्रेम तसेच व्यवसायातील यशासाठी भाग्यरत्न म्हणूनही वापरला जातो. निर्णय घेता न येणार्यांनी, सतत व्दिधा मनस्थिती असणार्यांनी मूनस्टोन धारण करणे उपयुक्त ठरू शकते. परीस्थितीचे घटनांचे व्यापक संदर्भात आकलन करण्याची क्षमता या खड्यामुळे प्राप्त होते.
( कि. पेंडन्ट रु. ३०० पासून )
रत्न पायराईट ::
हा खडा ऐहिक आणि आध्यात्मिक अश्या दोन्ही पातळ्यांवर यश संपादन करून देणारा आहे.यामध्ये धनसंपदा खेचून घेण्याची आकर्षण क्षमताही आहें ज्यांना एकाच विषयावर जास्त काळ लक्ष केंद्रित करणे अवघड जाते त्यांच्यासाठी या खड्याचा वापर विशेष फलदायक ठरतो. साधनेसाठी चित्त एकाग्र होण्यासाठी उपयोगी होणारा खडा विद्यार्थी वर्गालाही अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास उपयोगी ठरतो. आर्थिक संपन्नता आणि आरोग्य देणारा हा खडा आहें. भावनिक पातळीवर ज्यांना स्वास्थ्य हवे आहे त्यांनी हा जरूर वापरावा. आरोग्य चांगले राहून दीर्घायुष्य लाभावे या करता याचा उपयोग होतो.
( कि. पेंडन्ट रु. ३५० पासून )
रत्न सिट्रीन ::
प्रामुख्याने अतिचळवळेपणा वा अस्वस्थपणा, मानसिक हरवलेपण या सगळ्यावर हा खडा उपयुक्त ठरतो. पौरुषत्वाची, मर्दानगीची वाढ करणारे हे रत्न आहे. आनंदप्राप्ती, विचारांची स्पष्टतां, आत्मविश्वास, उर्जेचा अखंड पुरवठा, आरोग्य या सगळ्यासाठी सिट्रीनचा वापर केला जातो. शांतपणा, टीका, क्रोध सहन करण्याची क्षमता वाढवण्याची क्षमता यांत आहे. मंद हालचाल असणार्यांमध्ये चपळपणा निर्माण करायला हा सहाय्यभूत ठरतो. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि अंतर्गत अवयवांची शुद्धीही साध्य होते. ज्यांना आपल्या पुर्वजांबद्दल देवदेवतांबद्दल माहिती नाही त्यांच्या भावना अज्ञानात असलेल्या आत्म्यापर्यंत पोचवण्याचे काम हा खडा करतो. त्यामुळे एका अर्थाने पूर्वजांशी, पितरांशी संबंध जोडून देणारी ही यंत्रणा आहे.हवेतले प्रदूषित आचारविचार आणि प्रत्यक्ष हवा यांना प्रदूषण मुक्त करण्याची विलक्षणताकद यां यामध्ये आहे. सगळ्यातऱ्हेच्या मानसिक त्रासावर आणि अमंगल विचारांवर या खड्याचा शुभ परिणाम दिसून येतो. दीर्घायू देणारे हे उपरत्न बद्धकोष्टता, मूत्रविकार, रक्ताभिसरन, मधुमेह, त्वचाशुद्धी यावर देखील प्रभावीपणे हे काम करते.
( कि. पेंडन्ट रु. ४०० पासून )
रत्न ऱ्होडोक्रोसाईट ::
हृद्य बळकट करणे, पोट, यकृत यांची कार्यप्रणाली सुधारणे, दृष्टीदोष नष्ट करणे, अति खादाडपणावर नियंत्रण भावनिक संतुलन या सगळ्यावर हा खडा उपयोगी ठरतो. श्वसननलिका, फुफ्फुसे यांच्या विकारांवरही या खड्याचा उपयोग होतो. तसेच रक्तशुद्धीसाठी याचा प्रभावीपणे वापर केला जातो. साधारणपणे हृदयाच्या समपातळीवर या खड्याचा वापर करता आल्यास रक्ताभिसरन अधिक योग्य प्रकारे आणि चेतनामय होते. झोपतेवेळी हा खडा उशीखाली ठेवल्यास स्वप्नांचा पूर्णपणे पाठपुरावा करता येऊ शकतो. आणि स्मरणशक्ती वाढते.अंतर्मन आणि बाह्यमन यांमध्ये सुसंवाद निर्माण करणारा असा हा खडा आहे. प्रेमाची देवाण-घेवाण, नैराश्याला पळवून लावणे, उत्साह आणि आत्मविश्वासासाठी हा खडा आतिशय शुभ परिणामकारक आहे. परम, करुणा, क्षमाशीलता, विश्वासार्हता या सगळ्यामध्ये वृद्धी करणारा तसेच गतआयुष्यातील वाईट गोष्टी बाजूला करून, विस्मृतीत ढकलून नवी उमेद व उत्साह निर्माण करणारा, व नव्याने जगण्याची इच्छा निर्माण करणारा असा हा ऱ्होडोक्रोसाईट रत्न फारच चमत्कारिक आहे.
( कि. पेंडन्ट रु. ४०० पासून )
रत्न जेड ::
या खड्याच्या अंगी अद्भुत आकर्षण शक्ती आहे. घश्याचे विकार, फुफ्फुसाचे विकार त्याच प्रमाणे मूत्रपिंडाच्या विकारांवरही याचा उपयोग होतो. जलद नाडी छातीत होणारी धडधड यावर चटकन नियंत्रण मिळविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हृद्यविकारात बऱ्याचदा अतिशय घाम येणे अनुभवाला येते अश्यावेळी जेड चा अतिशय गुणकारी उपयोग दिसून आला आहे. त्वेचेची निगा आणि रक्तशुद्धी यावरही याचा प्रभाव होतो. अपघात, आजार, जादूटोणा, यापासून हे रत्न संरक्षण करतो. दीर्घायुष्यासाठी जेड उपयोगी ठरते अशी समजूत सर्वत्र आहे. चातुर्य, व्यवहारिक समज, सहनशक्ती, प्रेमाची देवाण-घेवाण या सर्व गोष्टीमध्ये वृद्धी करणारे हे रत्न नैराश्य, दुष्ट आणि वाईट विकारांवर मात करतो. तसेच मनुष्याला दीर्घायुष्य आणि ऐश्वर्यसंपन्न करण्यासाठी जेड चा वापर फलदायी ठरतो. मात्र या सोबत मोती, वा पोवळे धारण करू नये.
( कि. पेंडन्ट रु. ३०० पासून )
रत्न टायगर आय ::
हितशत्रूच्या कारवायांपासून संरक्षण करणारा खडा अशीही याची ओळख आहे. विस्कळीत मनोव्यापार वा मनोवृत्ती असणाऱ्याना स्थैर्यप्राप्तीसाठी हा खडा विशेष लाभदायी ठरतो. स्वत: नेमक्या ईच्छा, आकांक्षा, क्षमता ओळखण्यास मदत करून आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपयोगी पडतो. उपयुक्त गोष्टींचा नित ताळमेळ घालून देणारा हा खडा आहे. आवश्यकता असेल त्याकाळापुरताच टायगर्स आय चा वापर करण्यात सुचविले जाते. आपल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी वा पैसा मिळविण्याची काळजी दूर करण्याचे काम हा खडा करतो. तसेच जननसंस्थेशी संबंधीचे विकार तशीच मोडलेली हाडे सांधण्यासाठी हा खडा सहाय्यक ठरतो.
( कि. पेंडन्ट रु. ३५० पासून )
रत्न ब्लडस्टोन ::
दिसायला काहीसे कमी आकर्षक वाटले तरी हे अल्पमोती रत्नगुणांच्या दृष्टीने मात्र अतिशय समृद्ध आहे, हा खडा गर्द हिरवा, काळसर हिरवा असा उपलब्ध होतो. फक्त काहीवेळा त्यावर लाल रंगाचे टीपके दिसून येतात. आपल्या अंगी साहस कमी पडत असल्यास अश्यावेळी ब्लडस्टोन सुचविल्या जातो. ज्या ज्या ठिकाणी साहसाची अति आवश्यकता आहे अश्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याना हा खडा चांगले परिणाम देतो. तसेच आर्थिक भविष्याची नाहक चिंता न करता वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मदत करतो. अवघड परिस्थितीतून वात काढण्यासाठी लागणारी शारीरिक व मानसिक उर्जा देण्याची क्षमता यांमध्ये आहे असे मानले जाते. रक्तशुद्धी आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो.
( कि. पेंडन्ट रु. ३५० पासून )
रत्न रेडगार्नेट ::
परस्परां मधील नाते अधिक सक्षम आणि सकारात्मक होण्यासाठी हा खडा सहाय्यभूत ठरतो. आघात, दुस्वप्ने, बिघडलेले आत्मिक संतुलन , माणसाच्या मनाला ताण आणणाऱ्या कुठल्याही गोष्टी या सगळ्यावर या खड्याची मात्रा चालते. दु:ख, उघडी जखम यांसारख्या बाबींवर त्याचा उपयोग होतो, तसेच अपघात टाळण्यासाठीहि त्याचा उपयोग होतो. धाडस, मनोबल, आत्मविश्वास, स्वाभिमान या सगळ्यांसाठी यांचा वापर करावा. सकारात्मक उर्जेचा कारक असलेला हा खडा स्नायुदुखी, सांधेदुखी, ज्वर, काविळीसारखे विकार, रक्त विकार, आतड्याचे विकार, अन्नातून झालेली विषबाधा, अशुद्ध रक्त, मुत्र पिंडाचे विकार, हृद्य विकार, फुफ्फुसे विकार, यांवर प्रभावीरित्या काम करतो. नाभीप्लीहा, पाठीचा कणा , इंद्रिये यांच्याशी तो जास्त संबंधित आहे. याबरोबर शरीरातील हार्मोन्सचा समतोल राखण्यासाठी याचा उपयोग होतो असे सांगितले गेले आहे.
( कि. पेंडन्ट रु. ४०० पासून )
रत्न स्मोकी क्वार्टझ ::
औदासिन्य, (उदासीनता) तीव्र नैराश्य, यातून मुक्त होण्यासाठी, सहाय्य करणारा खडा म्हणून स्मोकी क्वार्टझकडे पाहिले जाते.’ स्व’तत्वाची जाणीव करणारा हा खडा उधोग व्यवसायात फारच आवश्यक कल्पकता वाढवून नवनवीन गोष्टी शिकण्यास उपयुक्त ठरतो. धारण करणाऱ्याला त्याच्या ध्येयाची व स्वप्नांची पूर्तता करण्याची क्षमता त्याच्यामुळे लाभू शकते. जेव्हा तग धरण्याची,टिकून राहण्याची गरज आहे, अश्या परिस्थितीमध्ये याचा वापर मोठाच आधार ठरू शकतो. अधिक आत्मविश्वास, जोश हवा असेल तर हा अवश्य धारण करावा.
( कि. पेंडन्ट रु. २०० पासून )
रत्न ओपल ::
” धारण करणाऱ्याची सुरक्षा हा महत्वाचा संकेत या उपरत्नाकडे आहे. माणसाला नैराश्याच्या बाहेर काढण्यासाठी हा खडा सहाय्य ठरतो. कुठलाही मानसिक ताण, त्रास वाढला, शारीरिक पीडा वाढली, अथवा कुठलेही आकस्मिक संकट येणार असेल तर स्वत: तुटून हे बहुमोल रत्न याची पूर्व सूचना देते. पांढऱ्या रंगाचे ओपल हे अतिसंवेदनशीलता प्रदान करते. सर्वतर्हेचे चर्मरोग, उष्णते मुळे होणारा त्वचेचा दाहमुरूम आणि फुट्कूळ्या, यावर पांढरे ओपल रामबाण ठरते. डोळ्यांचे आरोग्य, केसांची निगाठेवण्याचे कार्य हा खडा करतो. शरीरातील अशुद्धीद्रवे वेचून, बाजूला काढून बाहेर फेकण्याचे काम याचे आहे.
( कि. पेंडन्ट रु. ७०० पासून )
रत्न रोझं क्वार्टझ ::
या खड्याची खरी ओळख ‘ स्वप्रचीती’ चा खडा असे सांगावे लागेल. ‘स्व’ शी नाते जोडणारा स्वत: संवाद साधण्यास मदत करणारा असा आहे. कुठल्याही गोष्टीतील सौंदर्य चांगुलपणा दृष्टीस आणून देण्याचे महत्वाचे काम हा खडा करतो. मध्यमवयीन ताणतणावावर उपयोगी असलेला हा खडा नुसता काही काळ हातात धरला तरी आपली नेमकी उद्दीष्टे आठवून देतो. कोणी आपल्यावर प्रेम करीत नाही. आपलि तशी लायकीच नाही, असे ज्यांना वाटते आणि त्यामुळे आत्म विश्वास कोसळत असेल अश्यांना याचा वापर लाभदायी ठरू शकतो. भावनांची देवाण-घेवाण करण्याची क्षमता प्रदान करण्या बरोबर नकारात्मक भावनांचा अंमल कमी करण्यास हा खडा मदत करतो. लहापनापासूनचे असलेले भयगंड आणि उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी तसेच प्रेम भंगाच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी हा परिणाम कारक मानला जातो.
( कि. पेंडन्ट रु. २०० पासून )
रत्न स्पटिक ::
हि निसर्गाने खड्यांच्या रुपात दिलेली सगळ्यात अनमोल देणगी म्हणावी लागेल. उर्जेत वाढ करण्याची अमाप क्षमता असलेल्या या खड्यात उपचाराची ताकदही विलक्षण आहे. निसर्गाने केलेल्या रचणेमुळेच त्याला हे वैशिष्ट प्राप्त झाले आहे. प्रकाशाकडे, सर्वोच्चतेकडे ,परिपूर्णतेकडे झेपावण्याची मानवी मनाची आस स्पटिकामध्ये जणू प्रतीबिंबित होते. उर्जा खेचून घेण्याची, साठवून घेण्याची आणि ती उसर्जीत करण्याची क्षमता आढळून येते. एवढेच नव्हे तर उर्जा संतुलन साधण्याचे आणि ती प्रभावी ठेवण्याचे महत्वाचे कार्य यामध्ये होऊ शकते. धारण करणाऱ्याच्या गर्जेनुसार स्पंदन अनुकुलता साधत शारीरिक आणि मानसिक शुद्धीची क्रिया स्पटिकामुळे साधता येते. आत्मिक विकासासाठी सहाय्य करणारा आणि दाह कमी करणारा म्हणून स्पटिकाकडे पाहिले जाते. बाहेरील नकारात्मक स्पंदनापासून रक्षण करण्याची क्षमताही स्पटीकात आढळून येते. कोणीही धारण केला तरी उपयोगात ठरणारा हा खडा रोगप्रतिकारक यंत्रनेला चालना देऊन शरीरातील सर्व चक्रांचे संतुलन साधून आरोग्य मिळवून देतो.
( कि. पेंडन्ट रु. १५० पासून )