महिला जागतिक दिवस




Like
Like Love Haha Wow Sad Angry

International Women’s Day – 

International Women’s Day is celebrated on 8th march every year. This day is celebrated in the different regions to show respect,appreciation and love towards the women for their political, economic and social achievements.

International Women's Day

आज हिंदू समाजात नव्वद टक्के पुरुष मुलीच्या जन्मानंतर प्रसन्नता व्यक्त करीत नाही. असेही बघायला मिळते, किती लाजेची गोष्ट आहे, जी स्त्री त्याला या पृथ्वी तळावर जन्माला घालते तिच्यामुळे मानव म्हणून प्रगटला आहे तिचीच घृणा करितो, तिच्या जन्माने तो स्वत: अभागी समजतो. हे त्याने बोलून दाखविले नसले तरी त्याचे हाव भाव नेत्र तेच दर्शवितात. हास्यस्पद बाब आहे.

जसजशी मुलगी मोठी तसतसे मुलामुलीत भेदभाव तयार होतात. पालन-पोषण, शिक्षण, खेळणे-कुदने यात मुलांना प्राधान्य दिल्या जाते. सध्या आर्थिक दृष्टीने सधन असलेल्या घरात सुविधा असल्याने मुलींना आवश्यकतेनुसार सवलती दिल्या जातात. परंतु मध्य वर्गीय घरांत आधि मुलांच्या आवश्यकतेवर लक्ष दिल्या जाते. आजही जुन्या विचाराच्या स्त्रिया लहान पणातच मुलींना त्यांच्या हिनतेची जाणीव करून देतात. आणि हेच कुसंस्कार आणि अंधविश्वास वर्तमान समाजात हानी कारक ठरतात.

आपले विचार असतात कि मुलींवर खर्च असतो आणि ती शेवटी सासरी जाऊन आपल्याला दुरावणार आणि  मुलगा मोठा होऊन आपल्या पालनपोषणाचा सहारा होईल. मुलांच्या बाबत हि आपलेपणाची भावना खूप असते. पण हीच भावना अत्यंत घातक आणि हानीकारक ठरत आहे आपण आता बघतच आहोत.

परंतु कुणाला महित नाही कि समाजाचा आधार आणि पुरुष्याची अपेक्षा शेवटी स्त्रीच आहे. तीच मुलगी पुढे कुणाची गृहिणी, पत्नी, माता होणार तीच समाजाच्या भावी पिढीला जन्म देऊन विकसित करणार. जर तिच्या वरचं तुम्ही अत्याच्यार केलेत. तर ती प्रथमच मनाने दुर्बल असेल. पितृ गृहात तिची उपेक्षा झालेली असेल तीच दूरदर्शिता हानीकारक ठरते. आणि सासरी गेल्या नंतरसुद्धा ती  सासर कडून वा पती कडून अपमानित जीवन जगत असेल तर ती आपल्या अपत्यांवर संस्कार करण्याठी दुर्बल ठरू शकते. संस्कार देण्याकरिता सुद्धा तिचे तन,मन, चित्त प्रसन्न असायला हवे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu