General Knowledge : General Knowledge has been defined in differential psychology as “culturally valued knowledge”.
कृपा करून लक्षात घ्या. जे काही आपल्याला चालू परिस्थितीत प्राप्त झाले आहे, ते सर्वतोपरी मानून त्याचाच सदुपयोग करा तेव्हाच आपले कल्याण होईल. जेवढे मिळाले आहे तेवढ्याचीच गरज आहे. जेवढी विद्या, ज्ञान आहे त्यापेक्षा जास्त जाणून घेण्याची गरज नाही.जेवढे बळ,बुद्धी,योग्यता व परिस्थिती आहे त्याचाच सदुपयोग करा म्हणजे त्यातच तुमचे कल्याण आहे. हाच सिद्धांत होय.
आपल्या जवळ सर्व असते पण त्याचा उपयोग न करून घेता,त्याला महत्व न देता आपण दुसरीकडेच जास्त लक्ष पुरवितो म्हणून आपण सदा दु:खी असतो. हीच आपली कमजोरी आहे, सद्धया जी परिस्थिती आपल्या समोर आहे, ती नेहमी करीता नसते त्यात बदल असतोच पण आपल्याला धीर नसतो. आपल्यात ज्ञानाची कमी नसते. परंतु जेवढे ज्ञान आहे त्याचा परिपूर्ण सदुपयोग आपण करीतच नाही. जेवढे ज्ञान आपल्याला असते तेवढ्याचीच गरज असते तेवढाच आपल्या उद्धाराकरीता परिपूर्ण असतो. त्यात आपली फसवेगिरी होत नाही. परंतु त्याही पेक्षा वगळे मिळावे म्हणून जेव्हा आपण जास्त विनाकारण बुद्धीचा वापर जर केला त्यात आपण नक्कीच फसतो.
उदा :- शरीर नाशवंत आहे आपल्याला माहित असूनही त्याला प्राप्त करण्याची ईच्छा मात्र होतेच.
म्हणून जेवढे ज्ञान,वैभव मिळायचे ते मिळणारच आहे परंतु त्याच्या साठी ज्याप्रकारे आपण अयोग्य अशी उलाढाल करतो ती योग्य नाही. या करीता अधीर होऊ नका. योग्य वेळेची वाट बघा. परिस्थिती बदलणारच आहे. योग्य वेळेच्या आत जर आपण आपल्या कुबुद्धिचा वापर करून जर काही करणार असाल तर त्या कर्तुत्वाला ‘विनाशकारी विपरीत बुद्धी ‘ असेच म्हणावे लागेल.
आपण स्वत: नाशवान नाही आपले प्रत्युत शरीर नाशवान आहे. आपल्याला मिळालेल्या सर्व सुख वस्तू नाशवान आहेत. जे काही वस्तूस्थितीत आज आहे ते नष्ट होणार आहे. आपण स्वयं पहिले होतो, आतापण आहोत आणि नंतर सुद्धा राहणारच.
जे काही नष्ट होणारे आहेत त्याचा योग्य तेथे उपयोग करावा पण भरोसा करू नका, तो आपला आधार समजू नका. जी वस्तू आपल्या जवळ नाही, तर त्याची आशा ठेवू नका कारण ती नंतर मिळून नष्ट झाली तर त्याही पेक्षा जास्त दु:ख पदरी पडते. मग त्या पासून सुख काय आहें.
शरीर नाशवान आहे हे आपण जाणतो पण मानत नाही. कारण आपण आपल्या जाणण्याला मानले असते नाशवान वस्तू ला महत्वच दिले नसते. त्याची आशा केलीच नसती. त्याच्या नष्ट होण्याची चिंता केली नसती. जी परिस्थिती आपल्याला हवी आहें तशी न मिळाल्याचे दुख झालेच नसते. हे दुख म्हणजे मुर्खताच होय. परिस्थितीत काही दु:ख किंवा संकट आले असले तरी ते जाणारच असते, कारण सुख देणारी वस्तू जाणारच आणि दु:ख देणारी वस्तू जाणारच शेवटी नाशवंत ते नाशवंत पण आपली समज, किंवा विचारात मूर्खता असते. कारण जीवनाचा अंत म्हणजेच मरण.