2
Kakad Aarti – Pandhurang :-
This is a marathi aarti sung in the worship of God Pandhurang also known as Vithoba or Vitthala by their Devotees. Marathi Unlimited Consist of All Old and New Arti Collection. Visit Marathi Unlimited.
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती | पंचप्राण जीवेभावें ओवाळूं आरती ||१||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा | दोन्ही कर जोडूनी चरणीं ठेविला माथा ||धृ ||
काय महिमा वर्णू आता सांगणे किती | कोटी ब्रम्हहत्या मुख पाहतां जाती ||२||
राही रखुमाबाई उभ्या दो बाहीं मयूर पिच्छ चामरें ढांळीती ठायीचे ठायीं ||३||
का म्हणे दीप घेऊनि उन्म्नीत शोभा | विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ||४||
2