रमेश – सुरेशचा टेक्नो-सॅव्ही अंदाज पहा ‘पोश्टर गर्ल’मध्ये




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Meet the techno-twins, Ramesh-Suresh – We have seen Ramesh-Suresh in the world of advertising. Now the names will surely get too familiar in every Marathi household as Ramesh and Suresh will be seen in the movie ‘Poshter Girl’.  Though they share the same names, our jodi is different and more dear to us. Ramesh is played by Akshay Tanksale and Suresh by the man who has always brought a smile on our faces, Sandeep Pathak. Ramesh and Suresh are both equally techno-savvy.

Poshter girl

जाहीरातीतून आपल्या अनोख्या शैलीचे प्रदर्शन करत भारतभर नावलौकिक मिळवणारी रमेश – सुरेशची जोडी पोश्टर गर्ल मधून पुन्हा एकदा आपल्या समोर येते आहे. या चित्रपटात आपण रमेश – सुरेशचा टेक्नोसॅव्ही अंदाज पाहू शकणार आहोत. रमेशच्या भूमिकेत अक्षय टंकसाळे आपल्याला दिसणार आहे, तर अनेक नाटक, सिनेमातून आपल्या चेहऱ्याची कळी खुलवणारे संदीप पाठक यांनी सुरेशची भूमिका साकारली आहे.

यडगावकर पाटलांच्या घरात जन्माला आलेले हे जुळे पुत्र. डिजीटल भारताची खरीखुरी ग्रामीण प्रतिमा आपल्यासमोर उभी करायला सज्ज झाले आहेत. वायकॉम18 मोशन पिक्चर्स निर्मित आणि चलो फिल्म बनायें प्रस्तुत ‘पोश्टर गर्ल’ ने स्वयंवराचा निर्णय घेतला आणि पारगाव टेकवडे गावातले सगळेच तरूण बोहल्यावर चढले. ‘एक नार कैक बेजार’ अशी परिस्थिती गावात निर्माण झाल्यामुळे त्यातल्या त्यात बरे उमेदवार निवडण्याची जबाबदारी काकांच्या मजबूत खांद्यांवर येऊन पडली. या काकांच्या दमदार भूमिकेत ऋषिकेश जोशी आपल्याला दिसणार आहेत. त्यांनी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी एक हे रमेश – सुरेश.

पाटील घराण्यात जन्माला आलेल्या रमेश – सुरेशला टेक्नोलॉजीचे भारी वेड… आणि याच वेडापायी पारगाव टेकवडे गावात कोणतीही नवीन टेक्नोलॉजी सर्वप्रथम या पाटलांच्याच घरी येते. भारतराव झेंडे (जितेंद्र जोशी), बजरंग दुधभाते (अनिकेत विशवासराव), अर्जुन कलाल (सिध्दार्थ मेनन) नंतर आता रमेश – सुरेश (अक्षय टंकसाळे-संदीप पाठक) हे स्वयंवरातले शेवटचे उमेदवार…

आता या पाच जणांपैकी पोश्टर गर्ल नक्की कोणाला पसंत करते हे कळेल येत्या 12 फेब्रुवारीला तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu