Sages from pre Vedic era had very good knowledge of Astrology. There are three main sub-divisions of Astrology. “Skandha” literally means a big branch springing from the trunk of a tree. The three skandhas of Jyotisha are : siddhanta, hora and samhita.
सिद्धांत, संहिता आणि होरा असे ज्योति:शास्त्राचे तीन स्कंद म्हणजेच शाखा आहेत. हि तीन मिळून तयार झालेले ज्योति:शास्त्र म्हणजे वेदाचे नेत्र होय. सिद्धांतग्रंथात ग्रहांच्या कक्षा म्हणजे त्यांचे भ्रमणमार्ग, ग्रहांदिकाच्या स्पष्टगती स्थिती म्हणजे कोणत्या वेळेस कोणता ग्रह कोठे असेल हे ठरविणे, हा निर्णय गणितांच्या सहाय्याने केला जातो. म्हणून सिद्धांतस्कंदाला ‘गणितस्कंद’ असेही म्हणतात.
संहितास्कंदात धुमकेतू, ग्रहणे, ग्रहांचे उदयास्त इ. आकाशस्थ गोलांच्या स्थितीमुळे जगाला होणाऱ्या बऱ्यावाईट फलांचे वर्णन केलेले असते.
होरास्कंदात एखाद्या मनुष्याच्या जन्म काळाच्या ग्रहनक्षत्रलग्नादीकांवरून त्याला त्याच्या जीवनात काय काय सुख-दु:ख होतील इ. गोष्टींचे कथन केलेले असते. होरास्कंदाला ‘जातकस्कंद’ असेही म्हणतात. याप्रमाणे ज्योति:शास्त्राच्या तीन शाखा आहेत.
जातकाची ताजिक म्हणून एक पोटशाखा आहे. ताजिकग्रंथात वर्षफलाची माहिती सांगितलेली असते. एखाद्याच्या जन्मकाळी आकाशात जितक्या राशी अंशांदिकांवर सूर्य असेल तितक्या राशीं, अंशांदिकांवर तो पुन: आला म्हणजे त्या मनुष्याच्या आयुष्याचे कोणतेही एक वर्ष पूर्ण होते. त्या वेळेच्या लग्नकुंडलीवरुन त्या वर्षात त्याला काय काय सुखदु:खे होतील हे समजते. त्या कुंडलीला वर्षफल कुंडली म्हणतात.