जीवनाचे ध्येय (भाग-3)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

what is the emotion you are looking to get from your result? How are you going to be being, from day to day, to make sure you evoke that emotion from within? In other words, who are you going to be being, in order to create the results of your intention?. what is aim of your life. read this article to learn about aim of the life.

The real purpose of lifeलघुता पासून तर महानतेच्या या प्रवासात मनुष्य काही तत्वांचीच मदत घेऊन पुढे जाऊ शकतो. जे स्वत: अमर्त्य आहेत, स्वप्रकाशित आहे, असीम आहेत ते तत्व सर्वत्र आहे. व ते स्वत: मनुष्यातहि उपलब्ध आहे. ते अन्यत्र कोठे शोधण्याची गरज नाही. ती मौलिक शक्ती सर्वांत आहे. लहान बीजांत आहे, नदीत आहे, जगातील प्रत्येक पदार्थात आहे. त्याच शक्ती द्वारे ते आपली सर्व कार्ये साध्य करतात. बाह्य साधनांचा उपयोग करून प्रत्येक पदार्थ आपल्या आतील शक्तीला जागृत करतो. आणि त्याला अमर्यादित अश्या शक्तीकडे प्रवाहित करून आपले ध्येय गाठतो. मनुष्य सुद्धा आपल्या या मौलिक शक्तीला जागृत करून आपले कार्य पूर्ण करू शकतो.

लघुतापासून मह्त् च्या यात्रेच्या प्रवासाचे शतीकेंद्र स्वत: मनुष्याच्या आतच विद्यमान आहे. त्या द्वारे आपल्या ध्येयाला तो प्राप्त करू शकतो. मनुष्याच्या अंतरंगात असणाऱ्या या शतीकेंद्रासाठी मनुष्याला ईतका पुरुषार्थ करणे आवश्यक आहे कि तो आतील पडद्यांना बाजूला सारून त्या बिंदूचे दर्शन करू शकेल. संपूर्ण एकाग्रतेने त्यात तो केंद्रित झाला कि एक दिवस त्याची हि चीर यात्रा आपोआपच संपूर्ण होईल. त्या बिंदू मध्ये असीम सिंधू सामावलेला आहे. सिंधू हाच बिंदूच्या रूपाने मनुष्याच्या अंतरंगात वसलेला आहे. त्या दोघांचे गुणधर्म सारखेच आहे. याच बिंदूच्या मदतीने एक दिवस मनुष्य हा सिंधु मध्ये आपली गती प्राप्त करू शकतो. कारण की दोघांची गती एक दुसर्यात आहे. प्रकाशमय, अमर्त्य, व अमर्याद महत्वाचा हा बिंदू मनुष्या करीता त्याच प्रकारच्या महान प्राप्तीचे विशाल तत्व आहे. सकाळ झाल्या नंतर सुर्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो मनुष्याने स्वत:च्या घराचे दरवाजे उघडून बाहेर बघितले तर तो सूर्याचे दर्शन प्राप्त करून कृतार्थ होवू शकतो. इतकेच काय त्याचे संपूर्ण शरीर सुद्धा त्या कोवळ्या किरणांच्या प्रकाशाने लखलखीत होऊ शकते. त्याच प्रमाणे आपला आतील पडदा उघडून पाहिल्यास मनुष्याला त्या परम तत्वामध्ये गती, दर्शन व अनुभूती हे सर्व काही मिळत असते. पण त्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

मानवी जीवनाच्या यात्रेचे ध्येय ईतके सहज,सरळ व सोपे असून सुद्धा मनुष्य आजपर्यंत कां भटकत आहे? याचे कारण हेच कि मनुष्य आपल्या शक्तीला आपल्या अंत:करणात न शोधता बाह्य जगात शोधत आसतो. कस्तुरी हरीण सुद्धा आपल्या नाभी मध्ये कस्तुरी असूनही तिच्या शोधासाठी ते गवत, झाडी, वृक्ष इ. मध्ये सर्वत्र शोधत असते. आणि याच प्रयत्नात ते मारले जातात. याच प्रमाणे मनुष्य बाह्य पदार्थांत जीवनाचे सत्य शोधत राहिला आणि त्याचा परिणाम आज पर्यंत तो अयशस्वी ठरला. बाह्य साधने सहाय्यक ठरू शकतात परंतु ते साध्य होऊ शकत नाही. काचेची पायली व लोखंडाची फ्रेम यांनी कंदिलाचे बाह्यरूप तयार होते, परंतु त्याची प्रकाश निर्मिती मात्र तेल वात व अग्नी यांच्या एकत्रित येण्यावर अवलंबून आहे.

लघुतेपासून मह्त् च्या या यात्रे मध्ये प्राथमिक आवश्यकता हि आहे कि मनुष्याने अंर्तमुख व्हावे. जीवनाच्या सर्व हालचाली केंद्रित करून त्यांना अंत:करनाच्या प्रयोग शाळेत लावावे ज्या प्रमाणे एक वैज्ञांनिक आपल्या प्रयोग शाळेत बसून विज्ञानाचे गंभीर रहस्य उलगवण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रमाणे मनुष्य सुद्धा अंतरीच्या प्रयोग

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d