शेवट परमेश्वराकडेच धाव




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Human beings are the worlds most intelligent creature. science has developed lot. we have achieve many things and Great inventions done through science. Even after such great development we cant forget God. The only thing we cant beat is God and He is the last option for us.

shewati dhaw parameshwarachaमनुष्य जन्म:कितीही स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण झाला असला तरी युगानुयुगे त्याला संघर्ष करूनच विकासा कडे जावे लागते. बुद्धीचा वापर करून अनेक गोष्टींची निर्मिती आपल्या गर्जे नुसार त्याने करून घेतली. विज्ञानाच्या माध्यमातून अनेक असाध्य अशा बाबी साध्य केल्या. आज मानव जग मुठीत घेऊन आहे भौतिक प्रगतीत भला मोठा पल्ला त्याने गाठला असला तरी प्रकृतीतील पंचमहाभूता समोर हि प्रगती अगदीच छोटी असल्याचे प्रत्यय आपल्याला प्रलय, भूकंप, अचानक व भयानक असे महापूर, वादळी प्रकोप अशा भयंकर नैसर्गिक आपत्या आपण बघतच आहोत.काळ केव्हा, कुठे आणि कुणावर अचानक झडप घालेल या बाबत विचारच करू शकत नाही. हि प्रकृती तर मानवाला चांगलीच होरपळून काढते. अशा परिस्थितीत संकटात सापडलेला माणूस फक्त एकच करू शकतो ते म्हणजे परमेश्वराचा धावा. भगवंताला प्रार्थनेच्या स्वरूपात आळवून आपले गाऱ्हाणे विनंतीच्या स्वरूपात प्रगट करून या संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग सुचविण्यास मदत मागतो. हा धावा त्यावेळेला अगदीच आंतरिक मनातून प्रगट होत असतो.परंतु मानवाचा नैसर्गिक स्वभावामुळे एकदा का तो या मार्गातून सुखरूप बाहेर पडला कि मग पुन्हा परमेश्वराचा धावा करण्यास तुरंत विसरून जातो.

संत सांगतात, संकटे येवोत किंवा नाहीत,नियमितपणे परमेश्वराला आठवीत राहावे. आपण स्वत:विश्वास ठेवावा. एखादे वेळी धावा केल्यावरही देवाने आपले एकले नसेल तरी, असे समजावे कि देवाला ठावूक आहे, कि तुमच्या वर आलेली अडचण तुम्हीच सोडवू शकता. आपली अडचण दूर होण्यास वेळ लागल्यास आपण आपल्या  देवावर असलेल्या श्रद्धेवर लगेच शंका करतो. त्या आस्थे विषयी आपली निराशा होते. अशा वेळी मनाला निराश न करता निर्णय क्षमता अंगी बाळगून कदाचित निर्णय चुकेलही पण त्यातून मार्ग कसा काढायचा याचे ज्ञान होईल. मनुष्याला त्याच्यावर संकटे आल्या शिवाय त्याच्यातील  सामर्थ्याची किंवा दुर्बलतेची कल्पना येत नाही.

नैसर्गिक कोप जेव्हा होतो तेव्हा तो रुद्र रूप धारण करतो. अशा वेळेला भेदारलेल्या नजरा या निसर्ग तांडवातून बचाव करण्याचा प्रयत्न करितात, डोळ्यापुढे प्रत्यक्ष मृत्यू उभा असून जगण्याची आस सुटलेली असते, अशा संकटातून तरले असताना आपल्याला एकाचीच आस लागलेली असते ती म्हणजे परमेश्वर तेव्हा तोंडून आपोआपच निघते कि देवा तू धावला नसता तर? तेव्हा मात्र आपण त्यावर पूर्ण विश्वास करतो कि त्यानेच आम्हाला वाचविले.किंवा कुणाच्या तोंडून निघते कि नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. परंतु कळत न कळत त्यांच्या मदतीला संकटाचा सामना करतेवेळी जो मदतीचा हात पुढे येतो व हा हात ज्यांनी पुढे केला असतो. त्याला त्या संकटातून बचावलेली व्यक्ती आपल्या मनाच्या गाभार्यात देवाचे स्थान देतो. तो देवा सारखा धावून आला, असेच उद्गार बाहेर पडतात. या सर्वांची सांगड म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्या कर्माशी असते.

नैसर्गिक आपत्तीत अक्षरश:मृत्युचा सामना करीत असतात, त्यावेळी त्याचा हि फायदा घेणारे माणुसकीला काळीमा फासणारे,माणुसकीचा बळी घेणारे लोक सुद्धा असतातच पण ते वगळल्यास आजही समाजात मदतीची भावना जिवंत असणारे व्यक्तीही आहेत, दु:खाच्या साचातून जी व्यक्ती घडते ती व्यक्ती मात्र सबळ,मजबूत,न घाबरणारी अशीच तयार होत असते. त्या व्यक्ती पासून सतत मदतीचाच हात पुढे होत असतो त्यांत आर्थिक, किंवा शारीरिक दुर्बलता असली तरी मानसिक भक्कम असते, ती मदतीला माघार कधीच घेत नाही.

आपल्या संस्कृतीत गंगेला आई व हिमालयाला पिता मानणारा आपला देश एक परिवार म्हणून आपण सारे एकत्रित राहतो. निसर्गाची छेडखानी किंवा त्याला आव्हान देण्याची कधीच चूक करू नाही, तो कधीही विक्राळ रूप धारण करू शकतो. त्यापुढे सारे वैज्ञांनिक गप्प बसतात. म्हणून निसर्गाच्या शक्तीला समर्पित भावनेनेच सामोरे गेले पाहिजे. आपली सद्भावनेची अग्नी प्रज्वलित करा. निसर्गाशी समरस होवून जगणे म्हणजे आरोग्यदायी जगणे होय. पूर्वी मनुष्य हा निसर्गाशी समरस होवून जगायचा तो त्याचमुळे निरोगी असायचा पण आज मनुष्य कृत्रिम बनलेला आहे, म्हणूनच त्याच्यावरील संकटे वाढली आहेत, त्याच मुले त्याचे विपरीत परिणाम तो भोगत असतो.

Article By Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu