भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या रडारवर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

narendra modi

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या सभेत नुकतेच इंडियन मुजाहिदीनने बाँबस्फोट घडवल्याचे उघड झाले असतानाच आता पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने नरेंद्र मोदींचा काटा काढण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला सुपारी दिल्याचे माहिती आता समोर आली आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणेने (आयबी) एका गोपनीय पत्रात हा उल्लेख केलेला आहे. मोदींवर आत्मघाती हल्ला करायचा कटही दहशतवादी संघटनांनी रचला असल्याचे या पत्रात म्हटलेले आहे.
आयबीने पाटणा बाँबस्फोटानंतर एक गोपनीय पत्र तयार केले होते. या पत्रात आयबीने दाऊद आणि आयएसआयच्या बैठकीचा दाखला दिला आहे. नुकतीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत आयएसआयने दाऊदला पुन्हा भारतात सक्रीय होऊन मोदींची हत्या करण्याची सुपारी दिल्याचे आयबीने म्हटले आहे.

सौदी अरेबियापासूनही मोदींना धोका
मोदींना भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांसह सौदी अरेबियातील दहशतवादी गटांपासूनही धोका असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सौदीमधील कट्टरवादी इस्लामी संघटनेचा शाहिद उर्फ बिलाल नामक व्यक्तीने मोदींच्या सभेत रिमोट कंट्रोलऐवजी आत्मघाती हल्ला करणे जास्त उचीत ठरेल असे स्पष्ट आदेश दहशतवादी संघटनांना दिल्याचे समजते. भारताती सिमी संघटना लष्कर, हरकर-उल-जिहाद अल- इस्लामी आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असून मोदींवर हल्ला करण्यासाठी सिमी या दहशतवादी संघटनांची मदत घेण्याचे प्रयत्न करत आहे.

नक्षलवाद्यांकडूनहि मोडी यांना धोका
नरेंद्र मोदी दहशतवाद्यांपाठोपाठ आता देशातील नक्षलवादी संघटनांच्या सुद्धा रडारवर असून स्फोटकपदार्थांनी भरलेली गाडीची मोदींच्या गाड्यांच्या ताफ्याला धडक देणे किंवा लाँचरच्या माध्यमातून मोदींच्या गाडीला उडवणे यासाठी नक्षलवादी संघटना प्रयत्न करत असल्याचा दावा आयबीने या पत्रात केला आहे.

Modi the target, Pak ISI turns to Dawood Ibrahim for help, Inter-Services Intelligence of Pakistan has turned to its old confidant Dawood Ibrahim seeking his aid to attack BJP prime ministerial candidate

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu