संजय घाडी आणि राजा चौगुले पुन्हा एकदा मनसेमध्ये

Like Like Love Haha Wow Sad Angry शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले हे पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

raj vs udhav

शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले हे पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत… शिवसेनेमध्ये सन्मान न मिळाल्याने नाराज असलेल्या या दोघांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येणाऱ्या दसऱ्याला घाडी आणि चौगुले पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश  करणार आहेत. माजी नगरसेवक राजा चौगुले यांनी २००७ मध्ये मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र २०१२ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट न दिल्यानं त्यांनी घाटकोपरमधून बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं होतं. तर २००९ साली विधानसभेचे तिकीट नाकारल्याने संजय घाडी यांनी मनसेमधुन आपल्या पत्नीसह शिवसेनेचा रस्ता धरला होता. त्यावेळी शिवसेनेत त्यांना उपनेतेपद देण्यात आलं होतं. राज ठाकरेंचे कधीकाळी विश्वासू सहकारी असलेले घाडी आणि चौगुले आता पुन्हा एकदा मनसेमध्ये परतणार आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories