रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नागरिकत्वाबद्दल चाललेल्या वादावर राजन यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली असून, मी भारतीय आहे व कायम भारतीयच राहणार असल्याचे स्पष्ट केले. माझ्याजवळ भारतीय पासपोर्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
मी भारतीय नागरिक आहे आणि यापुढेही भारतीय नागरिकच राहीन, असे सांगत त्यांनी आपला पासपोर्ट दाखविला. मी कोणत्याही इतर देशाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही, तसेच दुसर्या देशाचे नागरिकत्वही घेतले नाही, असे त्यांनी सांगितले. माझ्याकडे ग्रीनकार्ड आहे, पण त्यासाठी इतर देशाची शपथ घ्यावी लागत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ग्रीनकार्ड हे अमेरिकेत काम करण्याचे वर्क परमिट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राजन यांनी अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्य केले आहे. प्रथम विद्यार्थी म्हणून, त्यानंतर तेथील विद्यापीठात तसेच नाणेनिधीत त्यांनी काम केले आहे.
नाणेनिधीत ते प्रमुख अर्थतज्ज्ञ होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी राजन यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न उकरून काढला होता.
मी भारतीय आहे आणि कायम भारतीयच राहणार- रघुराम राजन

Leave a Reply