अता नव्या संपादक निवडीसाठी शनिवारी बैठक, नवीन संपादक कोण होणार?
साने गुरुजी(Sane Guruji) यांनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादनाची धुरा यदुनाथ थत्ते (Yadunat Thatte), ग. प्र. प्रधान (G.Pra. Pradhan), वसंत बापट (Wasant Bapat), सदानंद वर्दे (Sadand Warde) आणि अन्य समाज धुरीणांनी सांभाळली. अलीकडच्या काही वर्षांत ही जबाबदारी डॉ. नरेंद्र दाभोळकर(Dr. Narendra Dabholkar) सांभाळत होते. डॉ. दाभोळकर यांच्या पश्चातही त्यांनी सुरू केलेली पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ‘साधना’ सुरूच राहणार आहे. ‘जोवर शक्ती असेल तोवर ‘साधना’ टिकेल’ असे साने गुरुजी यांनी पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटले होते. साने गुरुजी यांच्याच विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेल्या या साप्ताहिकात पुढे काळानुरुप तसेच संपादकांनुसार काही बदल झाले. मात्र पुरोगामी विचारांचा वारसा अंकातून सुरू राहिला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या पद्धतीने अंकात काही बदल केले. आता डॉ. दाभोळकर यांच्या पश्चात ‘साधना’चा प्रत्येक अंक अधिकाधिक दर्जेदार आणि डॉ. दाभोळकर यांचे विचार तितक्याच ताकदीने समाजापर्यंत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान आहे.
वारसदार कोण?
डॉ. दाभोळकर यांच्या पश्चात ‘साधना’च्या संपादनाची धुरा कोणाकडे द्यावी, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी येत्या शनिवारी ‘साधना’चे विश्वस्त, पदाधिकारी आणि संबंधितांची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या बैठकीत डॉ. दाभोळकर यांच्या वारसदाराची निवड केली जाईल.स्त्रोत:स्त्रोत: