अभिनेते प्राण यांचे आज मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक चित्रपटात प्राण यांनी भूमिका केल्या आहेत. त्यातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिका अजरामर ठरल्या. उपकार (Upkar), जंजीर (Janzir), डॉन (Don), दुनिया हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘खानदान’ (Khandan), ‘औरत’ (Aurat), ‘बड़ी बहन’(Badi Bahan), ‘जिस देश में गंगा बहती है’ (Jis desh me Ganga Bahati Hai), ‘हाफ टिकट’ (Half Ticket), ‘उपकार’ (Upkar), ‘पूरब और पश्चिम’ (Purab aur Pachim), ‘डॉन’ (Don) आणि ‘जंजीर’ (Zanjir) यांचा समावेश आहे. भारत सरकारने त्यांना भारतीय सिनेमाच्या योगदानासाठी पद्म भूषण पुरस्कार २००१ मध्ये देण्यात आला आहे.