संकल्प शक्ती




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Determination power  We learned quickly that the most important predictor of success is determination. At first we thought it might be intelligence. Everyone likes to believe that’s what they want. Determination is simply not giving up. No matter how hard things get, or how badly you want to just give up, you keep on going.

determinationसंकल्पशक्ती हि एक मनुष्याच्या जीवनात अतिशय महत्वाची बाब आहे. त्याशिवाय जीवनात उन्नतीच नाही. कोणत्याही महत्वाच्या  कार्याचा संकल्प निश्चित केल्या शिवाय त्या कार्याची सुरवात आणि शेवट सुद्धा नाही. संकल्पशक्ती पूर्णत: विकसित होण्यास दृढ आत्मविश्वासाची आवश्यकता असते. तो आत्मविश्वास ईश्वरभक्तीनेच प्रगट होत असतो. ईश्वरावर श्रद्धाभाव ठेवूनच येतो. मनुष्य स्वत: कितीही सर्वशक्तिमान सर्वव्यापक असेल तरी कुठलेही कार्य तो स्वबळावर पूर्ण करू शकत नाही. समस्त कार्य ईश्वराला समर्पित करून निष्काम भाव ठेवून स्वत एक साधक (कार्यकर्ता) समजून करीत असेल, तर त्याची शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शक्ती अगाध वाढत असते, तेथेच ईश्वर अद्भुत चमत्कार दर्शवून आपल्या भक्ताच्या कार्याला पूर्णविराम देत असतो. ईश्वर ओळखतो आपल्या भक्ताची इच्छा उचित आहें. ईश्वराचा भक्त अनुचीत आणि असत्य कार्य कधीच करीत नाही.

भक्ताचा जो शब्द- त्याच्या वाणीद्वारे निघतो तो त्याला समर्पित होत असतो. तो भक्ताची परीक्षा घेतो,त्यामुळे अवलंब जरूर होतो,पण त्याला भक्ताचे कार्य करावेच लागते. (कार्य तोच करीत आहें हीच ईच्छा ठेवावी) म्हणून म्हणतात कर्म कर फळाची ईच्छा बाळगू नको.

आज जितकेही महापुरुष संत होवून गेले, ज्यांना आम्ही आदर्श मानतो,त्यांचे स्मरण करतो.त्यांचे जीवन पवित्र आणि उच्च होण्या मागे त्यांची संकल्पशक्ती, दृढआत्मविश्वास आणि ईश्वरभक्तीच होय.  जेव्हा मनुष्याला आभास व्हायला लागेल कि माझ्यावर काही विपत्ती येणार त्यावेळी मनातील संकल्प व विचार एकदम पवित्र बनवावे.  म्हणजे कोणतिही येणारी कठिनाई किंवा दुर्भाग्यवश घटना आपल्या शुद्ध संकल्पाने टळून जाते.   (मैस्मेरिज्म, हिप्नोटीज्म, तेलिपैथि, स्प्रिचुअलिज्म यांत ही अलौकिक संकल्पशक्ती काम करीत असते. मार्कोनीचे बिनतारी ताराच्या यंत्राने (wireless telegraphy) या संकल्पशक्तीची अतिउत्तमता सिद्ध केलेली आहें. एखादे वेळी आपण दुष्ट व्यक्तीसाठी तिरस्काराचे किंवा वाईट विचार केले असता आपल्या संकल्पशक्ती द्वारे ते विचारप्रखर होवून तो पर्यंत फिरत असतात की त्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोचतात.ईतका पॉवर त्या शक्तीत असतो.

वातावरणात वेगवेगळे  विचार भ्रमण करीत असतात. मनुष्यात ज्या प्रकारचे विचार सुरु असतात.तेव्हा भ्रमण करणारे त्याच प्रकारातील विचार आपोआप आपल्या कडे येण्याचा प्रयत्न करतात. यावर मनन करून बघा ज्यावेळी आपल्या मनात वाईट विचार आले कि ते लवकर आपला पिछा सोडत नाही. जोपर्यंत आपण आपल्या प्रबळ शक्तीने उत्तम विचारांचा संकल्प मनात आणत नाही. उदा. एखादे दिवशी आपण महात्म किंवा धार्मिक पुस्तकाचे वाचन करा, तेच विचार आपल्या मनात दिवसभर सुरु असतात.  दुसरे विचार येवून निघून जातात  पण पहिलेचे विचार पुन्हा पुन्हा येतच राहतात.त्या करीता सकाळी थोडे तरी धार्मिक वाचन केले पाहिजेत.  पूर्वीच्या काळी गुरु आणि शिष्यात याच प्रमाणे संकल्पसिद्धीनेच एकमेकांना विचार पोचवित. हि एक मानसिक प्रेरणा होय. हे गुप्त अध्यात्मिक संबंध होत.

दुसऱ्यांसाठी आपण प्रेम भावना ठेवली असतां (तो कितीही आपला दुश्मन असोत) काही दिवसांतच त्या व्यक्तीच्या मनातील आपल्या बद्दलच्या वाईट भावना आपोआपच कमी होत जातात. आणि त्याचाच विरोधाभास म्हणजे आपला कुणी दुश्मन असला त्याच्या बद्दल आपण दुष्ट विचार रोजच्या रोज करीत बसलात तर आपोआपच दुष्मनी वाढतच जातें.कारण आपले विचार आपल्या संकल्पसिद्धीने त्याचे पर्यंत पोचत असतात. म्हणून कुणाही बद्दल वाईट विचार, घृणा न ठेवतां चांगले स्वच्छ विचार करा,म्हणजे आपल्यात स्वयं चांगले विचार प्रभावित होतील व दुसर्यांच्या मनात सुद्धा आपल्याबद्दलचे चांगले विचार घर करतील. संपूर्णप्राणीमात्रांच्या जीवांसाठी स्वयं सुंदर विचार ठेवलेत यांतच आपले जीवन सुखी व निरोगी होईल आणि दुसऱ्यांचे ही कल्याण होईल.

सर्वजीवांच्या सुख प्राप्ती साठी कलेला संकल्प विश्वबंधुत्वाच्या भावनेला दृढ बनविते. मनात कधीही कुविचार आले असता त्यांना दृढ संकल्पशक्तीने,आत्मशक्तीने दूर करून चांगले विचार मनात रुजविले पाहिजेत. स्वामी विवेकानंद म्हणतात– मनुष्याने रात्री झोपते वेळी आणि सकाळी उठतेवेळी चारही दिशां कडे मुख करून प्रबळ संकल्पशक्तीने सर्व विश्वाच्या सुख-शांतीची कामना केली पाहिजेत. शुद्ध आणि स्वच्छ विचाराने शरीर स्वास्थ्य आणि मन प्रबळ होते.मनुष्याने शुद्ध विचाराने स्वत:ला आनंदी बनविले पाहिजे.मनुष्य दिवसभर एखाद्या रोगाचा विचार करीत बसत असेल तर तो अवश्य रोगी बनतो. मनुष्याने प्रतीदिन आशाजनक   प्रसंन्नतापूर्वक व कोणत्याही कार्यात महत्वाकांशी विचार ठेवलेत तर तेच तरंग आपल्या रक्तात प्रभाव करतात. तेव्हाच जीवन सुखमय होवून स्वत:च्या कार्यात यश प्राप्त होऊ शकते.
मनुष्यास जीवनात कधी अपयश प्राप्त झाले तर ते दुर्भाग्यवश समजू नये,तेथे आपली निर्बलता समजून दृढ संकल्पशक्तीने परत प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल. अटळ संकल्प एक बलशाली शक्ती होय. ती आपल्या अनुकूल अवस्थेकडे आकर्षित करते. ही संकल्पशक्ती मनाला एकाग्र करून मस्तिष्कात उत्पन्न होणार्या विचारांना सहाय करीत असते. म्हणून आपल्याला काय बनायचे त्या नुसार दृढ संकल्प व तसेच विचार मनात रुजवायला हवे, तेच विचार आपले सहधर्मी होऊन त्याच प्रमाणे परिणामस्वरूप आपल्या उद्देशानुसार सफलता प्राप्त करून देतात.
मनुष्य जन्मताच महान नसतो. जो आपल्या अध्यात्मिक शक्तीने कार्यास लागतो तोच महान होतो. संत तुकाराम,   संत ज्ञांनेश्वर, संत नामदेव हे आपल्या दृढ संकल्पशक्तीनेच महान झाले, असे किती तरी उदा. आहेत. नेपोलियन बोनापार्ट हा फ्रांस चा सामान्य सैनिक होता परंतु आपल्या दृढसंकल्पशक्तीने तो फ्रांसचा सम्राट झाला.या यशामागे फक्त त्यांची दृढसंकल्पशक्ती.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा