दैनंदिनी आपण अनेक मानसिक तणावांना तों देतो त्यासाठी अनेक वेळा आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण अनेक क्लुप्त्या वापरतो. पण निव्वळ संघर्षच करीत राहिलो तर मनाचा संतुलन बिघडून मानसिक व शारीरिक रोगांना बली पडू शकतो. याकरिता विवेक हा मनाचा तोल सांभाळण्याचे काम निरंतर करीत असतो काही प्रसंगी संकटांना बगल देण्याचे कामसुद्धा विवेक मनाद्वारे करून घेतो. अशा प्रकारे मानसिक संतुलन साधले जाते. विवेकास अनेक प्रकारच कामे करावी लागतात त्यापैकी मनास संतुलित ठेऊन सुरक्षितता प्रदान करणे हे एक अति महत्वाचे काम होय.
मनाची तगमग आणि विवेक.
अंर्तमनातून सुरु झालेले विचार,कल्पना विवेकाच्या पातळीवर येउन आढळतात, तेथे त्याची छाननी ( scrutiny ) सुरु होते. योग्य /अयोग्य/हितकर /अहितकर याचा पडताळा करून वेगवेगळे प्रश्न योग्य विचार चेतन मनाकडे (conscious ) पाठविले जाउन ते मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु होतात. अनावश्यक विचारांचा विवेकाच्या पातळीवर निकाल लावला जातो. पण काही विचार ईतके तीव्र असतात, कि ते विवेकाची पातळी ओलांडून चेतन मनाकडे झेपावण्याचा प्रयत्न करतातऽश्याहि वेळी विवेक हा अमंगल टाळण्याकरीता प्रयत्नशील राहतोच, एकदा का अनावश्यक विचार विवेकाच पातळी ओलांडून थोडे वर आले कि मग मनाची तगमग ( anxiety) व्हायला सुरुवात होते. हि तगमग अल्पकाळ असू शकते पण हि आलेली तगमग दूर करण्याकरीता विवेका द्वारे निरनिराळ्या क्लुप्त्या वापरणे सुरु हते व यामुळे आलेल्या संकटापासूनबचाव करण्या करीता सुरक्षात्मक उपाय योजनेस सुरवात होते.… काही भावना, विचार तीव्र स्वरूपाचे असतात. अश्यावेळीते विचार विवेकाची पातळी ओलांडून बाह्य मनाकडे झेपावन्याचा प्रयत्न करितात.प्र्न्तु विवेक व बाह्य मनाच्या मध्यातच या कल्पना राहून मानसिक व्यग्रता (restlessness) वाढण्यास सुरवात होते. मनाची एकाग्रता भंग होऊन मन चिंताग्रस्त (worried) बनते. तोच तच विचार मनात येणे, हे विचार दिवसाच्या अर्धावेळा पेक्षा जास्त काल येतच राहते व कोणतेही काम करणे अवघड होऊन बसते. आणि झोप सुद्धा येत नाही. यानंतरची पुढील पायरी म्हणजेनिरनिराळ्या मानसिक व शारीरिक रोगांची सुरवात पण हि अवस्था येण्या अगोदर बराच वेळ विवेकाची मनाशी संघर्ष सुरूच असतो. जेणे करून हे रोग होऊच नये. याकरिता विवेकाची बचावात्मक प्रक्रीयां सुरु होऊन झालेली काळजी, चिंता कमी करण्याचे प्रयत्न सुरु होतात. या प्रकारे चिंता कमी केली जाउन मन दुसरीकडे केंद्रित होईल अशी क्रिया केली जाते
चिंतेची जाणीव जरुरीच.
असे म्हणतात कि ” चिंता हि चिते पर्यंत लवकर पचण्यास मदत करते.” हे जरी खरे असले तरी मानवी मनास चिंतेची जाणीव असल्या खेरीज जीवनात स्वारस्यच राहणार नाही. म्हणून काही अंशी चिंता असायलाच हवी. अन्यथा माणूस माणूसपणच विसरून जाईल, आपण कोण आहोत? दिवस कि रात्र? आपले नातेवाईक कोण? आपण कोणाच देण लागतोय काय ? ईष्ट /अनिष्ट, मंगल/अमंगल यातील भेद न कळल्याने जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही. या करीता चिंतेची जाणीव असणे अत्यंत जरुरीचे आहे, म्हणूनच तशीच सोय केलेली असणार. हीच चिंता विवेकाच्या संतुलित क्षमतेच्या मर्यादा बाहेरील असेल तर विवेक पुन्हा प्रयत्न करून मनास संतुलित राहण्याकरीता तर्हेतर्हेच्या उपाययोजना करून जीवन सुखकर करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण चिंतेच्या भोवऱ्यात मन अडकले की विवेकास सुरक्षात्मक भूमिका घेणे भाग पडते. पण येथे विवेक कमजोर पडला कि मानसिक रोग जोर धरण्यास सुरवात करतात.
*** विवेकाच्या बचावात्मक काही क्रिया ज्या प्रमाणे घडतात त्यां पाहुं ***