उन्हाच्या वेळी करुया कमाल




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Summer vacation for school students, read more about the summer vaccinations and sports arts need to play in summer.
Summer vacations of students

दर वर्षी उन्हाळा आला कि सुट्ट्या आणि मुलांची धमाल सुरु होत असते . या सुट्टयान मध्ये काय करावे हे मुलांना समजत नहि. या लेखात आपणाला उन्हाळाच्या सुट्ट्या कशा  आणि काय करत घालवाव्या ते दिले अहे.  मुलांची परिक्षा संपते आणि पालकांची परीक्षा सुरू होते. आई मी काय करू? कंटाळा आला, कोणती शिबिरे? कोणला सहली? नुसतीच भांडणे, आळस ? अशा अनेक प्रश्नपत्रिका घेऊन मुलांची सुट्टी येते…. ही प्रश्नपत्रिका पालक मुलांनी एकत्र येऊन सोडवणे आवश्यक असते. चला तर मग करु या आपली सुट्टी मजेशीर.

गेल्या वर्षीच्या वह्या, पुस्तकाबरोबर सुटीतले उपक्रम वजनांचा अंदाज नेमका बरोबर येतो का? ते पहाणे, कोर्‍या पानांच्या घरी वह्या बनवणे, चित्रकला वहितील चांगल्या चित्रांनी आपले कपाट सजवणे किंवा कोणाला देण्यासाठी भेटवस्तू बनवण्यासाठी त्याचा उपयोग करणे.पुढच्या वर्षासाठी लागणारे सामान कोणते असेल याची यादी करणे, खरेदी करणे, कोणते सामान न आणता आपल्याकडे असलेल्या गोष्टी परत वापरता येतील का ते पाहणे.

उन्हाच्या वेळी – घरच्या घरी

  • लहान लहान सोपी अशी कोडी सोडवणे.
  • जुने फोटो, सहलीचे, वाढदिवसाचे फोटो पाहून आठवणी तयार करणे.
  • नव्या सरबताचे प्रयोग करून पाहणे.
  • घरात येणार्‍या व्यक्तीच्या मुलाखती घेणे.
  • पहाटे पक्ष्यांचे आवाज ऐकणे, पक्ष्यांच्या दिनक्रमांची निरीक्षणे करण्याचा प्रयत्न करणे.
  • संध्याकाळी आकाशाचे निरीक्षण करणे.
  • नवीन पालवीचे निरीक्षण करणे

गाठी – भेटी

  • आपले नातेवाईक, लहान बाळांना आईवडीलांसोबत भेटायला जाणे त्यांचे निरीक्षण करणे घरी येवून त्यावर चर्चा करणे.
  • आपल्या शहरात आलेल्या परदेशी पर्यटकांच्या भेटी घेणे.
  • पत्र लिहून लांबच्या लोकांच्या संपर्क साधणे.
  • आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तीकडून त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या गोष्टी ऐकणे.

कला

  • विविध बियांचे चित्र तयार करणे.
  • मुक्त आपल्याला आवडणार्‍या गाण्यावर नाच करणे

 

थोडं काही वेगळं

  • ओळखीच्या व्यावसायिकांच्या कारखाना बघायला जाणे.
  • आंबे विक्रेत्यांकडे, आंब्याच्या पेट्या, आंबाची अढी घालण, यासारखा विविध फळांच्या कलमांच्या व्यवस्था पहायला जाणे.
  • आईस्क्रिम पॉट कसे बनविले जातात ते पहायला जाणे.
  • उसाचा रस कसा बनवला जातो त्याची माहिती घेणे.
  • माठ कसा बनवला जातो त्याची कृती समजवून घेणे.
  • घर कामात मदत करा, भाजीबाजार आणणे.

खेळ

  • शारिरीक व्यायाम
  • मैदानी खेळ
  • कोडी, शाब्दिक खेळ
  • बैठे खेळ
  • पाठांतर आणि स्मरण खेळ

भटकंती

  • आसापासच्या टेकड्यांवर जाणे.
  • नेहमी पेक्षा (कधी न गेलेल्या) बागेत जाणे.
  • प्रत्येक ठिकाणी (जास्त दूरचे अंतर सोडून) पायी जाण्याचा प्रयत्न करणे.
  • विविध खेड्यांना भेटी देणे.

 

 शिबिरे

  • चांगल्या व निवडक शिबिरांना जावे. शिबिरात मुलांच्या गमतीतून आनंद घेत शिकणे महत्त्वाचे.
  • शिबिरात नवनवीन मित्र तयार करणे त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्यातील वेगळेपण डायरीत लिहून ठेवणे.

असा स्वछंद वेळ देण्याबरोबर ह्या वेळेचा हिशोब मुलांकडे मागू नये.मातीत उन्हातान्हात पाण्यात खेळणे, रंगामध्ये बेकल रेघोट्या ओढणे हा लहान मुलांचा स्थायीभाव असतो. सर्जनशिलतेला वाव द्या. त्यांचे खेळ, कार्यक्रमे कामाचे नियोजन त्यांना स्वतःलाच करु द्या त्यासाठी प्रोत्साहन द्या. हा लेख आपल्याला आवडला असेल याची मला खात्री अहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा