स्त्रीभूण हत्यांच्या समस्येबद्दल जनजागृती साठी ‘सामर्थ्य’.

Like Like Love Haha Wow Sad Angry रोज कुठे न कुठे स्त्रीभूण हत्यांच्या अमानवी घटना उघडकीस येत असतांना या ज्वलंत आणि...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

samarthya marathi movie

रोज कुठे न कुठे स्त्रीभूण हत्यांच्या अमानवी घटना उघडकीस येत असतांना या ज्वलंत आणि अतिशय संवेदनशील सामाजिक समस्येबद्दल जनजागृती घडून आणणे या उद्देशाने स्वयंभू प्रॉडक्शन ‘सामर्थ्य’ या आगामी चित्रपटाची (Upcoming Marathi Movie Samarthya) निर्मिती करीत आहे. ‘सामर्थ्य’ हा चित्रपट बीडमध्ये झालेल्या अत्यंत पाशवी स्त्रीभूण हत्याकांडावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांचे असून चित्रपटाची निर्मितीही त्यांनीच केली आहे.  ‘सामर्थ्य’ चित्रपटाचा मुहूर्त १३ मे रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ११ वाजता सिद्धिविनायक मंदिर, दादर येथे पार पडला.

चंद्रशेखर सांडवे (Chandrashekhar Savande) हे गेली २४ वर्ष चित्रपट, टीव्ही आणि नाट्य क्षेत्रात कार्यरत असून ‘सामर्थ्य’ या (Movie Samrthya) चित्रपटाद्वारे ते निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. स्त्रीभूण हत्या होवू नये म्हणून यासाठी सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याबरोबरच अश्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी चित्रपटात योग्य ते उपाय सुचविले आहेत.

चित्रपटाची पटकथा चंद्रशेखर सांडवे, जन्मंजय पाटील, स्वप्नील जाधव यांनी लिहिली असून संवाद आणि गीते जन्मंजय पाटील आणि स्वप्नील जाधव यांनी लिहिली आहे. अनिकेत करंजकर हे ‘सामर्थ्य’ चित्रपटाचे कॅमेरामन असून राजेश सावंत यांनी संगीत दिले आहे. कलादिग्दर्शन कमलेश मोरे यांनी केले आहे. चित्रपटात अरुण नलावडे (Arun Nalade), आसावरी जोशी (Asavari Joshi), शीतल पथक (Shital Pathak), उदय सबनीस (Uday Sabnis), मिलिंद गवळी (Milind Gavali),  स्वप्नील जाधव (Swapnil Jadhav), अमिता खोपकर (Amita Khopkar), शिरीष घाग (Girish Ghag), राजेंद्र जाधव (Rajendra Jadhav) यासारख्या मराठीतील अत्यंत नामवंत कलाकार काम करणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरच्या गावामध्ये करण्यात येणार आहेत

Source : मराठीमुव्हीवर्ल्ड ( www. marathimovieworld. com)

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories