ठाणे शहरात काँग्रेसनं LBT (Local Body Tax) बाबत गांधीगिरीचं दर्शन घडवलं. एलबीटीला विरोध दर्शवू नका, LBT (Local Body Tax) हा प्रत्येकाच्या फायद्याचा आहे. व्यावसायिकांनी बंद पाळू नये. काँग्रेसनं गांधीगिरीचा मार्ग पत्करला असताना दुसरीकडं मनसेने दोन दिवसात बंद मागे घेतला नाही तर आम्ही मनसे स्टाईलने दुकाने उघडू, असा इशारा दिला आहे. तर शिवसेना LBT (Local Body Tax) च्या पूर्णपणे विरोधात आहे. LBT (Local Body Tax) म्हणजे काय हे समजून घ्यावं असं आवाहन करत ठाण्यात काँग्रेसने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं. प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन व्यावसायिकाला गुलाबाचे फुल दिले. त्यांना LBT (Local Body Tax) बाबत माहिती देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.