पृथ्वीला सूर्याची उष्णता ज्या प्रमाणात ज्या काळी मिळते. त्या नुसार ऋतूबदलतात . आपण भारतीय शा ऋतू मानतो. अक्लाञ्च्या आवडत्या वसंत ऋतू मागोमाग ग्रीष्म ऋतूंचे आगमन होते. हवामान बदलते हवेतील उष्मा वाढतो. मध्यानसमयी घराबाहेर पडणे नकोसे होते. हवामानात ज्या वायू अनुसार असे स्थित्यंतर होते त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिनी आहारविहारात बदल केलेपाहिजे. ग्रीष्म ऋतूंत म्हणजेच उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळेच आपल्या शरीरातील स्निग्धांश घटतात व शरीरात वायुचा संचय होतो. उन्हाळ्यात आपण थोडेजरी बेफिकीर वृत्तीने वागलो तरी वांती, जुलाब, उष्मा, मुर्च्छावैगरे त्रास होण्याची शक्यता असते. यास्तव ग्रीष्म ऋतूत वायुचा संचय होणार नाही व वायुनाशक असा आहारविहार करणे. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
ग्रीष्म ऋतूंचे आगमन हे शरीरातील रक्तशुद्धीसाठी होते असे मानले जाते. ग्रीष्म ऋतूत शरीरातून घाम जातो. या घामाच्या द्वारे शरीरातील एक प्रकारे विष बाहेर फेकले जाते. निसर्ग व मानव यांचे परस्पर अतूट असे नाते आहे. निसर्ग हा नेहमी मानवाला हितकर अशाच गोष्टी करतो. शरीरातून घाम निघतो. त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते. या उष्ण वातावरणात रक्तशोधक असा आमफलाची निसर्ग निर्मिती करतो. ऋतुमानपरत्वे जी फळे तयार होतात. ती त्या त्या ऋतूत मानवाला हितकारक अशीच असतात.यामुळे त्याचे सेवन केले पाहिजे. जर आपण ती फळे वापरली नाहीत तर आपल्या शरीरात जीवनसत्वे खनिजांची न्यूनता भासेल. शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होईल. व आपण नवनवीन रोगांचे शिकार होऊ. म्हणूनच त्या त्या ऋतूपरत्वे येणारी फळे ती आपण सेवन केलीच पाहिजे.ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात आपली दिनचर्या म्हणजे आहारविहार बद्ललाच पाहिजे तो असा— शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी भात, ज्वारी, गहू, मुग, तुरडाळ, मसूर, मटर, कलिंगड, खरबूज, काकडी, उसाचा रस, पुदिना, कांदा, कारली, आंबा, लिबू, चिंच, दही, दुध व हलके असे मधुर शीतल पदार्थ खावेत. लिंबू, ग्लुकोज मिश्रित सरबते, दह्याची लस्सी, रात्री चंद्राच्या प्रकाशात जेवण व निद्रा करावी. दिवसा वृक्ष, लता वेलींच्या शीतल छायेत किंवा खसचे पडदे लावलेल्या घरात राहावे, थंड पाण्याने आंघोळ व अल्प भोजन घ्यावे. आणि शक्यतोवर जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे तेही मडक्यातून थंड केलेले असावेत.
आणि हि दक्षता.
ग्रीष्म ऋतूत शरीरात वायुचा संचय होतो यास्तव या दिवसात अधिक व्यायाम करू नये. मद्य वै. सारखे नशा उत्पन्न करणारे पेय घेऊ नयेत.वा वस्तू सेवन करू नये.कारण याद्वारे शरीरात अधिक उष्णता व ज्वलन निर्माण होते. मुर्च्छा येण्याची शक्यता असते. सडलेली, अति पिकलेली फळे व शिळे पदार्थ खाऊ नये. असे पदार्थ खाल्याने वांती किवा जुलाब होण्याची शक्यता असते.व ग्यष्ट्रो, कॉलरा होण्याची भीती असते.उष्माघात होऊ नये यासाठी उन्हातही जास्त फिरू नये. उन्हाळ्यात माश्या जास्त प्रमाणात होतात यासाठी कुठलेही पदार्थ तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू उघडे ठेऊ नये. माश्या बसलेले पदार्थ खाऊ नये.
ग्रीष्म कालीन रोगांवर उपाय !
ग्रीष्मऋतूत थोड्याहि बेपरवाईमुळे होणारेआजार म्हणजे जुलाब, वांती, उष्मा, मुर्च्छा होण्याची शक्यता असते तेव्हा कापूर अर्क, पुदिना अर्क अमृत धारा वा कोल्रा मिक्शचर या पैकी कोणतेही औषध योग्य प्रमाणात द्यावे. आणि या पैकी कुठलेही औषध उपलब्ध नसेल तर धा लवंगा कुटून त्या अर्धा लिटर पाण्यात टाकून काढा करावा हा काढा एक एक चमचा हळूहळू घ्यावा. त्यामुळे वांती ताबडतोब थांबते. त्याच प्रमाणे पाच मोठ्या काळ्या वेलच्या घेऊन अर्धा लिटर पाण्यात टाकून काढा करावा. हा काढा एक एक चमचा हळूहळू घ्यावा. या योगे जुलाब थांबतात. जर एकाच वेळी जुलाब व वांती होत असतील तर हे दोन्ही काढे क्रमश: पाजावेत, म्हणजे आराम होतो.एक चमचा लिंबाचा रस एक चमचा कांद्याचा रस एकत्र करून त्यात थोडी मिरेपूड टाकावी तो रस वारंवार घेतल्यास वांती जुलाब बंद होऊन आराम वाटतो.
उष्णतेमुळे मुर्च्छा आली तर तोंडावर प्रथम थंड पाणी थिडकावे. नाकात कांद्याच्या रसाचे दोन थेंब टाकावेत.त्याच बरोबर ग्लुकोज आणि लिम्बाचा रस एकत्र करून हळूहळू प्यायला द्यावे. त्यामुळे त्वरित मनुष्य शुद्धीवर येतो. प्रखर उन्हेमुळे उष्मा झाला किंवा उन लागले तर ताबडतोब कानाच्या मागे व कानशिलावर कांद्याचा रस चोळावा. एक ग्लास थंड पाणी घेऊन त्यात २५ ग्राम ग्लुकोज व एका लिम्बाचा रस मिसळून ते पेय रुग्णाच्या अवस्थे नुसार त्याला दोनतीन वेळा प्यायला द्यावे. उष्मा, वायुनाशक,हृद्य शांतीदायक आणि आतड्यांना बलर्वधन असणारे आम्रपान म्हणजेच आंब्याचे पन्हे (जलजीरा ) याप्रमाणे घ्यावा. कैर्यां पाण्यात उकळवून किंवा विस्तवावर भाजून त्यातील गर काढावा व त्यात पाणी घालून प्रमाणशील पातळ करावा त्यात मीठ किंवा काळे मीठ गरम करून किंवा भाजून घेतलेले जिरे, सुंठ, मिरी, पुदिना साखर योग्य प्रमाणात घालावी. हे पन्हे रोज दुपारी किंवा रात्रीच्या वेळी जेवणा नंतर नियमित प्यावे. यामुळे उष्मा, वांती, जुलाब, पाणी-पाणी करणे, वै. रोगांचे भय नसते. व शरीरात उष्णता वाढत नाही. या सर्व नियमांचे योग्य पालन केल्यास व ह्वामानानुकुल आहार-विहार घेतल्यास ग्रीष्म ऋतूत आपले शरीर स्वास्थ्य चांगले राहू शकते
Hot summer care tips, Hot weather, salt water, humidity, and chlorine take their toll on our skin during the summer months. Marathi unlimited offers helpful summer skin care tips and