दिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग! . दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी राम सिंग याने तिहार तुरुंगात आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच या प्रकरणातील आणखी एक आरोपी विनय शर्मा याला तुरुंगात कैद्यांकडून मारहाण झाल्याचा , तसेच त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलाने बुधवारी केला. याच प्रकरणातील आरोपी राम सिंग यानं तिहार जेलमध्ये शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता विनय शर्मा याला मारहाण तसंच विषप्रयोग झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.