राष्ट्रीय चारित्र्याची गरज




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Marathi article of Satyamev Jayate : National caritryaci need. what our nation is need now. study this article and know about our Nation.

bharat महत्वाचे मुद्दे:राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे  राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य, – तथापि राष्ट्रातील   बहुसंख्य जनता स्वार्थी व नितीमुल्यहीन, –  शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायिक, शासकीय  ईत्यादी क्षेत्रांत राष्ट्रीय चारित्र्याचे हनन, राष्ट्रीय  चारित्र्य शुद्ध करण्याची जबाबदारी सरकार व  जनता या दोघांचीही आहे, उत्तम चारित्र्याचा  आदर्श मुलांसमोर ठेवला पाहिजे.

 थोर लेखक श्री. म. माटे म्हणत “देश म्हणजे  देशातील माणसे. प्रत्येक देशाची प्रगती ही त्या  देशातील माणसां वरून ठरते.”  बहुसंख्य माणसे  ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेवरून  देशाची अवस्था ठरली जाते. तद्व्तच राष्ट्रीय चारीत्र्य म्हणजे त्या राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य. वृक्षावरील एका फळावरून सार्या वृक्षाची किंमत ठरते. तसेच राष्ट्राच्या एखाद्या व्यक्तीच्या योग्यते वरून साऱ्या राष्ट्राची योग्यता ठरली जाते. म्हणून राष्ट्रीय चारित्र्य उत्तम राखण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. स्वत:ची जात, धर्म, प्रांत, भाषा इत्यादी सर्व भेद बाजूला सारून राष्ट्राचे हित ते माझे हित, राष्ट्राचा चा मान तोच माझाही मान अशी निष्टा बाळगून प्रत्येकाने वर्तन केले तर उच्चतम राष्ट्रीय चारित्र्य भारतात जन्माला येईल.

खेदाने असे म्हणावेसे वाटते कि आज आमचे राष्ट्रीय चारित्र्य फारच खालावले आहे. राष्ट्रातील बहुसंख्य जनता स्वार्थी, आत्मकेन्द्री झाली आहे. स्वतच्या विचारापुढे तिला राष्ट्राचा विचार तुच्छ वाटतो असंख्यांना नीतीमुल्यांची चाड नाही. संप्पतीच्या लोभामुळे तस्कर, धर्मार्धं, नफ़ेखोर, काळाबाजार करणारे आणि भ्रष्टाचारी आमच्या राष्ट्रमंदिराला उंदीर, घुशींप्रमाणे पोखरत आहेत. राष्ट्रविघातक शक्ती अन्य राष्ट्रांसाठी हेरगिरी करून राष्ट्र कमकुवत करण्याच्या मागे लागल्या आहेत. आपण आपापसांत भांडून एकमेकांचे लचके तोडू पाहात आहे. याचाच फायदा ईतर राष्ट्रांनी न उठवला तरच नवल.

शैक्षणिक, व्यापारी, व्यवसायिक, सामाजिक, आणि शासकीय अशा सर्वच पातळ्यांवरून राष्ट्रीय चारित्र्याचे हनन होत आहे. आज आमच्या विहित कर्तव्यात आम्ही टाळाटाळ करतो. विद्यार्थी मनापासून अभ्यास करीत नाहीत. त्यामुळे राष्ट्राने त्यांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च फुकट जातो. शैक्षणिक संस्थांत संप, मोर्चे, निदर्शने घेराव इत्यादी घडवून आणून इमारत, फर्निचर, इत्यादींची नासधूस करतात. शैक्षणिक क्षेत्रात तर कालाबाजारच चालू आहे. अगदी नर्सरी पासून ते कॉलेजेस पर्यंत पाल्यांच्या पालकां कडून वाट्टेल तेवढा पैसा वसूल करून विद्यार्थ्याची  नाव नोंदणी केली जाते. शाळांमध्ये चढाओढी चालू आहेत. व्यापारांनी जणू कोणताही माल शुद्ध स्वरूपात न देण्याचा चंगच बांधला आहे. प्रत्येक वस्तूतील भेसळी मुळे जनतेच्या किती तरी नुकसानी होतात. याची जराही खंत यांना नसते प्रत्येक क्षेत्रांतील लोकांना वाममार्गांने पैसा मिळविण्याची कीड लागली आहे. अध्यापक, डॉक्टर यांच्या व्यवसायालाही भरपूर प्रमाणात किडेने घेरले आहे. सार्वजनिक क्षेत्रात सार्वजनिक वस्तूंची चोरी नासधूस, अस्वच्छता, मोडतोड ईत्यादी गोष्टी सर्रास चाललेल्या आहेत आणि शासकीय पातळीत तर सर्वात जास्त प्रमाणात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. सरकारी क्षेत्रे तर कामचोर कर्मचाऱ्यांमुळे धुळीला लागलेले दिसताहे. अधिकार्यां पासून ते गेट किपर पर्यंत त्यांना काम नकोच फक्त गडगंड पैसा व आराम हवा.

 सार्वजनिक जीवनातील ही घाण निपटून काढण्यासाठी सुरवात कुठून करावी ? राष्ट्रीय चारित्र्य निकृष्टावस्थेत नेण्यास सर्व सामान्य जनता नेत्यांना जबाबदार धरते पण “यथा राजा तथा प्रजा! ” याउलट सरकार हेच जनतेचे प्रतिबिंब आहे यावरून दोन्ही बाजूने सखोल विचार करायला हवा. कारण जनतेतूनच लोक नेतेपदी निवडले जातात.म्हणूच राष्ट्रीय चारित्र्यबांधणीसाठी  दोन्ही  पातळ्यावरून प्रयत्न करणे आवश्यक आहे. जनतेने सोच विचारानेच नेता निवडला पाहिजे

राष्ट्रीय चारित्र्याचे महत्व भारतील राज्यकर्त्यांपासून सामान्य माणसा पर्यंत सर्वांनाच पटले आहे. हि चारित्र्याची घडण प्रथम घराघरांतूंच होणे आवश्यक आहे. कारण ‘ charity begins at home .  “घरातील कर्त्या व्यक्तींनी उत्तम चारित्र्याचा आदर्श मुलांसमोर ठेवला पाहिजे. मुले व तरूण हे राष्ट्राचे आधार आहेत. त्यांच्यात देशाभिमान, धैर्य, नितीमत्ता, संयम, नि:स्वार्थ-बुद्धि निर्माण करणे आवश्यक आहे. देशाविषयीची नितांत भक्ती त्यांच्या मनात रुजली पाहिजे. यासाठी हल्ली क्रमिक पुस्तकांच्या पहिल्याच पृष्ठावर प्रतिज्ञा दिलेली असते. आणि शिक्षण संस्था मधून ती म्हटली जाते.मुलांना त्याचा अर्थ माहिती झाला पाहिजे व त्या नुसार वर्तन घडले पाहिजे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राष्ट्राची ईतर मान चिन्हे हे प्रत्येकाचे मानबिंदू ठरणे आवश्यक आहे. यांचा अपमान कोणीही सहन करता कामां नये. अपमान करणार्यास कठोर शिक्षा मिळालीच पहिजे. व्यापारांनी माफक नफा घेऊन निर्भेळ वस्तू पुरविल्या पाहिजे. व्यवसायिकांनी स्वत:च्या व्यवसायाचे पावित्र्य टिकवले पाहिजे. माझ्या देशातील उत्पादनात काहीही दोष निघणार नाहीत अशी सर्वांची खात्री झाली पाहिजे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच राष्ट्रीयचारित्र्याची जोपासना केल्यास भारताची मान व शान उंचावण्यास विलंब लागणार नाही. ” सत्य मेव जयते” (Satya mev Jayate) हे खरे ठरेल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu