Temple of Humanity : We all must have to live with peace and prosperity. for good community and good society there must me place called Temple of Humanity.
महत्वाचे मुद्दे : परस्परांशी प्रेमाने व सहानुभूतीने वागणे म्हणजे मानवता, मानवतेची जपणूक करणारी व्यक्ती म्हणजे साक्षात ईश्वर, सर्वार्थाने जे अनाथांना सुख-शांती देते ते मानवतेचे मंदिर, महर्षी कर्वे, बाबा आमटे, अनुताई वाघ, मदर तेरेसा.
अशा थोर मानवतारुपी विभूतींचा वास या मंदिरात असतो, पाषाणमूर्ती असलेल्या मंदिरापेक्षा दु:ख सागरातून मुक्ती देणारे मानवतेचे मंदिर अधिक पवित्र व श्रेष्ठ होय.
* “मानवतेचे मंदिर माझे, त्यात लावल्या ज्ञानज्योती, श्रमिक हो घ्या ईथे विश्रांती | “मानवाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला भावनांचे वरदान असते एखाद्याच्या भावना न दुखावता त्याला सहानुभूतीने वागवणे म्हणजे मानवता.’ भूता परस्परे जडो मैत्र जिवाचे ‘ अशी मान्व्यापी परिभाषा करता येईल. ” जे का रंजले गांजले त्यासी म्हणजे जो आपुले.’ ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी.’ ”द्या करणे जे पुत्रासी तेचि दासा आणि दासी’. संत तुकारामांच्या मते, अशी मानवतेची जपणूक करणारी व्यक्ती म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती आहे.
* अठराविघ्ने दारिद्रयाने पिढ्लेल्यानां, कुष्ठरोगांनी, कर्करोगांनी ग्रस्त असलेल्यांना एखाद्या अवयवांची न्यूनता असलेल्या अपंगांना, मुकबधीर असलेल्यांना, दुर्बल मनस्कांना, मनोरुग्णांना, अनाथांना जी वास्तू निवारा देते, आनंद, सुख आणि शांती देते ते धाम म्हणजे “कैवल्यधाम” होय. “मंदिर” होय. या शांतीधामाची, मंदिराची स्थापना ज्यांच्या प्रयत्नांनी झाली ते सर्वजण भगवंताच्या मह्त्पदापर्यंत पोचतात. मन्दिर या शब्दातून दोन गोष्टी व्यक्त होतात.पहिली म्हणजे ते भगवंताचे पवित्र वसतीस्थान असते आणि दुसरी म्हणजे ते भक्ताच्या मनाला शांती देणारे असते.
* भारतात अशी भगवंत आणि त्यांची मानवतेचा संदेश देणारी अनेक मंदिरे आहेत. महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथील अनाथ महिलांसाठी आणि वृद्धांनसाठी चालविलेली संस्था, कलकत्याला मदर तेरेसा यांचा रुग्णालय, वरोऱ्याला बाबा आमटे यांचे आनंदवन, अमरावतीला अप्पा पटवर्धन यांनी चालवलेले कुष्टधाम या संस्था अनाथांच्या आधार झालेल्या दिसतात. आदिवासी मुलांच्या कळवल्याने त्यांना माणसात आणण्यासाठी ताराबाई मोदक यांनी सुरु केलेली व अनुताईनी चालविलेली कोसबाड येथील अंगणवाडी आणि वाडा येथे वनवासी मुलांसाठी चालवलेली आश्रमशाळा, कर्मवीर भाउराव पाटील यांनी सातारा येथील रयत संस्था हि आमची आजची काशीरामेश्वराची मंदिरे आहेत. अपंगांना कृत्रिम अवयव तयार करून देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार्या अनेक संस्था “मूक करोति वाचालम् पड्गुं लड्घयते गिरिम्’ याचा प्रत्यय आणून देतात. कमलाबाई होस्पेटांचा नागपूर येथील मातृसेवा संघ आणिक आणखी काही उदा. इथले देवही भक्तांचे दास होऊन त्यांची सेवा करताना दिसतात. मानवतारुपी देव अशा मंदिरामधून वास करतो. सर्वांभूती परमेश्वर असतो. या तत्वावर आत्मारामाची या मंदिरातून षोडषोपचारे पूजा केली जाते. तळमळ, चिकाटी, प्रेम, निष्काम कर्मयोग ही यांतील फुले, गंध, तुलस, बेल होत. या मंदिरातील देव अविश्रांत मेहनतीच्या आणि सेवेच्या नैवेद्याने प्रसंन्न होतो. अशा मंदिरात परमेश्वर मूर्तरूप धारण करतो.
* दु:खी जीवाची तळमळ शांत झाल्याने निर्माण होणारी शांती चिरंतन असते. अभंग असते. ईथला प्रत्येक पुजारी आपली नित्यकर्मे करण्यात मग्न असतो. “कोणत्याही जिवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे” या उक्तीचा प्रत्यय ईथे येतो. येथे दु:खाचे आनंदात पर्यवसन झालेले दिसते. टवटवीत चेहऱ्याने सत्-चित्-आनंदरूप होऊन येथील मानवतेचे सेवक वावरताना दिसतात. त्यांच्या दर्शनाने मानवाला मुक्ती शिवाय काय मिळणार? दु:ख सागरापासून मुक्ती, क्लेशापासुन मुक्ती, व्यंगापासून मुक्ती, असहाय्यतेतून मुक्ती अशा चारही मुक्ती येथे साधल्या जातात.
* रोज मंदिरात जाउन कर्मठपणे पाषाणमूर्तीची पूजा करण्यापेक्षा अशा मानवतेच्या मंदिरात जाउन तेथील दु:खितांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला तर ती पूजा देवाला खचितच आवडेल.