जाहिरातीचे युग
Like
Like Love Haha Wow Sad Angry
12921

We can see Advertising every where. ads are the very important part of business, to reach upto the client we need promotion and ads to put in market. Read about Advertising age (World of Advertising) .

world of advertisementमहत्वाचे मुद्दे: जाहिरात एक प्रतिष्ठीत व्यवसाय, जाहिरात एक जुनी प्रथा, जाहिरात करण्याची माध्यमे व साधने,  जाहिरातींचे फायदे, जाहिरातींचा उपयोग कसा करावा.

आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे. सध्याच्या औद्योगिक जगतात जाहिरातींना फारच महत्व आले आहे. एखाद्या मालाच्या आकर्षक जाहिरातीमुळे त्या मालाचा खप वाढू शकतो. आता तर जाहिरात तयार करून देणार्या संस्था निघाल्या आहेत. जास्तीतजास्त चांगली जाहिरात तयार करून देणे हाच त्यांचा व्यवसाय.  त्यामुळे जाहिरातीला एक प्रतिष्ठेचे व्यवसायी स्वरूप झाले आहे.

खरे तर जाहिरातीची प्रथा फार जुनी आहे. देवादिकाम्पासून जाहिरातबाजी चालत आलेली आहे. असे दिसून येते. अश्वमेध यज्ञ हि राज्यांच्या पराक्रमाची जाहिरात होती. लग्न जमवताना उपवर मुलगी अथवा उपवधू मुलगा कसा योग्य आहे हे पटवण्यासाठी त्यांच्या गुणांची, रुपाची, संपत्तीची प्रतिष्ठेची जास्तीतजास्त जाहिरात केली जात असे. हल्लीच्या व्यापार क्षेत्रात मालाचा उठाव होण्यासाठी जाहिरातबाजीचे तंत्र प्रभावीपणे वापरले जाते.

या जाहिराती जल, स्थल व्यापून दशांगुळे उरल्या आहेत. रेल्वे स्थानक, बसथांबे, रस्ते, चौक, उंच इमारती, मैदाने, लोकलचे डब्बे हे तर त्यांच्या तावडीतून सुटत नाहीतच, पण झाडांचे बुंधे, डोंगराची शिखरे, घराच्या भिंती, इलेक्ट्रिक खांब यांनाही व्यापून उरल्या आहेत, हे सर्व कमी पडते म्हणून की काय आकाशात फुगे सोडून जाहिराती केल्या जातात. विमानांचा सुद्धा जाहिरातीसाठी उपयोग केला जातो. रेडिओ, टी.व्हि, वर्तमान पत्रे, व्हि.डी.ओ, हे तर जाहिरातींचे राजमार्गच आहेत.

व्यापारी जाहीरातींप्रमाणे सरकारी धोरणे सामान्य मनसासमोर ठेवणार्या जाहिरातीही असतात. वनसंर्वधन, कुटुंबनियोजन, बालविवाह बंदी कायदा इत्यादींबाबत महत्वपूर्ण माहिती सरकार जाहिरातीतूनच जनसामान्यापर्यंत पोचविते.’ आपण यांना पाहिलत कां ? या जाहिरातीं मुळे हरवलेली माणसे सापडण्यास मदत होते. रक्त गटाच्या जाहिरातींमुळे रक्ताच्या दुर्मिळ जातीचे रक्त उपलब्ध होऊन एखाद्याचा प्राण वाचविल्या जातो. वर्तमान पत्रात येणार्या नोकरी, विवाह, जागाविश्य्क जाहीरातींमुळे जीवनातल्या अनेक समस्या सोडविल्या जावू शकतात.

सध्याची नवनवीन उपयुक्त उत्पादने समजण्यासाठी जाहिरातींचा उपयोग होतो.जाहिरातींचा मनावर फार मोठा प्रभाव पडतो. म्हणून मानसशास्त्रात जाहिरातींच्या अभ्यासाला फार महत्व दिले गेले आहे. ज्याद्वारे कुसंस्कार होतील अश्या जाहिराती जर सतत डोळ्यासमोर राहिल्या तर त्यांचा मनावर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

जाहिरात ही भरपूर उत्पनाची व खर्चाचीही बाब आहे. हे मान्य असले तरी असे सुचवावेसे वाटते की सरकारने जाहीरातींवर नियंत्रण आणावे. मालाचे वास्तव करणार्या, जिज्ञासा जागृत करणार्याव आकर्षक असूनही तरून पिढीला घडवीणार्या योग्य त्याच संस्कारितजाहिराती जनते पुढे आणाव्यात. आजचे हे जे बालक उद्याचे नागरिक असल्याने त्यांच्यावर योग्य संस्कार होणे तितकेच महत्वाचे व आवश्यक नाही कां ? याच काही बाबी लक्षात घेऊन योग्य नियंत्रण ठेवावेत.

We can see Advertising every where. ads are the very important part of business, to reach upto the client we need promotion and ads to put in market. Read about Advertising age (World of Advertising) .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
12921
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: