Hirwya Lasnache Dhirde :
Dhirde is a fast and nutritious formula that is open for your own innovative interpretation. Include/expel vegetables or diverse sorts of flours. Dhirde is dependably a hit with children.
रेसिपी : हिरव्या लसणाचे धिरडे– [यालाच लसणाचे आहाते सुद्धा म्हणतात]
साहित्य : अर्धा पाव हिरवे [ पाले लसून ] तांदळाचे पीठ दोन ग्लास [ नवीन तांदुळाचे असल्यास ते ] हिरवि मिरची ५ ते ६, चवी नुसार मीठ, हळद, कोथिंबीर, ओवा .
कृती : पाले लसून स्व्च्छ धुवून कापून घ्यावे त्यात, हिरवी मिरची कापून घ्यावी व कोथिम्बिर बारीक करून एकत्रित करून मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून पेस्ट करावी . त्यानंतर तांदुळाचे पीठ व पेष्ट एकत्रित करून थोडे चवी पुरते मीठ घालावे, किंचित हळद घालावी, त्याला भिजवावे, दोसा पीठ भिजवीतो त्याप्रमाणे. नंतर त्याला १५ मिनिट मुरु द्यावे. त्यात थोडा ओवा, तिखट चटक लागत असल्यास थोडी मिरची पावडर टाकावी, मंद आचे वर तवा मांडून गरम होऊ द्यावा नंतर वाटी मध्ये पाणी घेऊन त्यात एक मोठे चमच भर मीठ टाकून खारे पाणी तयार करावे. सुती कापडाचा छोटासा तुकडा पाण्यात ठेवावा. तवा गरम झाल्या नंतर त्या कापडाने मिठाचे पाणी तव्यावर फिरवून घ्यावे. [त्याने धिरडी तव्याला चिकटणार नाही,ती अलगद निघतात].त्यानंतर वाटीने तव्यावर धिरडी गोलाकार पसरवावी. त्यावर तेल भोवताली चमच्याने सोडावे. शिजू दयावी मग परतावी. दुसर्या बाजूने परत शिजू दयावे कडक करण्यास परत थोडे तेल सोडावे. स्वादिष्ट धिरडी याप्रमाणे तयार करावीत व गरम गरम सॉस सोबत खाण्यास द्यावी.
Source : Marathi Unlimited