जसे विध्यार्ह्यांना ड्रेस कोड सक्ती आहे तसेच आता शिक्षाकांना सुधा होणार आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांनाही ‘ड्रेस कोड’ लागू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला असला तरी २ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे, हे विशेष. जिल्हा परिषदेतील शिक्षक शाळेत राहत नाही, शाळेच्या वेळात ते बाहेर फिरत असतात, या बाबत अनेक तक्रारी होत्या. त्यावर उपाय म्हणून शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात यावा, असा विचार पुढे आला. यामुळे जि.प. शिक्षक स्वतंत्ररीत्या ओळखले जातील, हा मुद्दाही मांडण्यात आला. शिक्षण विभागानेसुद्धा हा मुद्दा उचलून धरला. शिक्षण समितीच्या बैठकीत ड्रेस कोड बाबत निर्णय घेण्यात आला.
Source : Marathi Unlimited.