अजित पवार यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्य़क्षतेखाली झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे. पाटबंधारे खात्यासंदर्भात माझ्या विरोधात जे आरोप झाले ते एका षड्यंत्राचा भाग आहे, हे षड्यंत्र करणारी व्यक्ती कोण आहे हे मला माहित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले, परंतु कोणत्याही व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलं नाही. राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता. सुमारे दोन तास शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.
Source : Marathi Unlimited.