३०० जणांचा धिंगाणा

Like Like Love Haha Wow Sad Angry पुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या चिल्लर पार्टीचं प्रकरण ताजं असतानाच वाघोलीत पुन्हा तरुण तरुणींच्या हायप्रोफाईल...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

rave party in puneपुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या चिल्लर पार्टीचं प्रकरण ताजं असतानाच वाघोलीत पुन्हा तरुण तरुणींच्या हायप्रोफाईल दारु पार्टीचा पर्दाफाश झालाय. वाघोलीच्या माया क्लबवर रात्रभर ही दारु पार्टी रंगली होती. तब्बल ३००तरुण तरुणींनी दारु पिऊन अक्षरक्ष धुडगूस घातला होता. पार्टीत ११२ मुली होत्या. या तरुण तरुणींनी पुण्याच्या संस्कृतीचे अक्षरक्षः धिंडवडे काढले. पुणे ग्रामीण पोलिसांना या पार्टीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या क्लबवर छापा टाकला. पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेत.

बेकायदेशीररीत्या दारू पिणं, धुडगूस घालणे आणि बेकायदेशीर कृत्यात सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीय. धक्कादायक बाब म्हणजे पुणे एटीएसमध्ये अधिकारी असलेल्या रजनीश निर्मल या पोलीस अधिका-याची पत्नी अंजली हिच्या नावावर हा क्लब आहे. पोलिसांनी माया क्लबमधून तब्बल दहा लाखांची उंची दारु जप्त केलीये. पोलिसांनी हा दारुसाठा जप्त केला आहे. तरुण तरुणी आणि पार्टीच्या आयोजकांवर कारवाई होणार असली तरी हॉटेल मालकाला इतरांप्रंमाणं मोकाट सोडणार का असा सवाल उपस्थित झालाय. गेल्या काही दिवसांत तीन दारु पार्ट्यांचा पर्दाफाश झालाय. त्यामुळं सांस्कृतिक राजधानी पुण्याच्या वाटचालीबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेयं.

Source : Marathi Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories