चित्रपट वितरणातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एक था टायगर’ या हिंदी चित्रपटाला राज्यातील सर्व शो हवे आहेत. त्यामुळे सर्व मराठी चित्रपटांवर मल्टीप्लेक्समध्ये अघोषित बंदी घालण्यात आली आहे…..बंदीचा पहिला फटका बसला ‘देऊळ’चे निर्माते अभिजीत घोलप यांच्या ‘भारतीय’ चित्रपटाला. या अन्यायाविरुद्ध निर्मात्यसह शिवसेना-मनसेने आवाज उठवला आहे. कलावंत आणि सेना-मनसे चित्रपट सेनेच्या आंदोलनासमोर अखेर पीव्हीआर मल्टिप्लेक्सनं अखेर माघार घेतलीय. १५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या बहुचर्चित `एक था टायगर` सिनेमासाठी नुकत्याच रिलीज झालेल्या `भारतीय` या मराठी सिनेमाला पीव्हीआर मल्टीप्लेक्समधून बाहेरची वाट दाखवण्याचा घाट मल्टिप्लेक्स मालकांकडून सुरू होता. आज कलावंतांनी शिवसेना आणि मनसे चित्रपट सेनेच्या नेतृत्वात मल्टिप्लेक्सवर काढलेल्या मोर्चानंतर मात्र मल्टिप्लेक्स मालकांनी माघार घेतलीय.
Source : Marathi TV