तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने देशभरातील आर्थिक व्यवहार थंडावण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांचे कर्मचारी, अधिकारी, १५ खाजगी बँका आणि ८ विदेशी बँकांचे १0 लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक इम्प्लॉइज असोसिएशनचे सचिव विश्वास उटगी यांनी दिली. बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयकावर २३ आणि २४ ऑगस्ट रोजी संसदेत चर्चा होणार आहे.
Source : Online Updates