Bharat Ek Mahan Shakti Bharat Ek Mahan Desh Hai, Bhaichara Aur Akhandta Eski Pehchan Hai.Duniya Ki Nazaro Mai Bharat Ek Mahan Shakti Ke Roop Mein UBhar Raha Hai.Hamari ..
जागतिक बल
भारत आणि त्याच्या उत्थानाचा मार्ग …………. स्वामी विवेकानंद.
ह्या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता एखादा देश असेल कि ज्याला “पुण्यभूमी” हे गोड आणि अन्वर्थक नाव अगदी यतार्थपणे देता येईल. जर असे एखादे स्थान असेल कि जेथे माणसात कोमलता, सुचिता दया, दाक्षिण्य, क्षमा, प्रभृती सदगुणांचा ईतर कुठ्ल्याहीपेक्षा अधिक विकास झाला आहे — जर कोणती एखादी भूमी असेल कि जिला अंतदृष्टीचे आणि अध्यात्मक्तेचे माहेरघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली मायभूमी भारतच होय. *** स्वामीचे आव्हान असे कि भारताच्या ईतिहासात असा एखादा कालखंड तरी दाखवून द्यावा कि जेव्हा जगाला हलवून सोडतील अश्या अध्यात्मिक महापुरुश्यांची भारतभूला उणीव भासली. परंतु भारताचे कार्य अध्यात्मिक आहे. आणि ते रनभेर्यांच्या निनादाने व सैन्याची पुढे चाल केल्याने नव्हे.भारताचा प्रभाव जगावर नेहमी निरव दवबिंदू प्रमाणे पडत आलेला आहे. तो ठळकपणे अवलोकनात जरी येत नाही तरीही त्याने पृथ्वी वरील सुंदर सुंदर फुलांना फुलविले आहे. अश्या आपल्या या मायभूमीचे अवघ्या जगावर अपार ऋण आहे. [स्वामी विवेकानंद ग्रन्थावली ५:७].*धर्माच्या बाबतीत भारताने ख्रिस्ती धर्मावर मोठा प्रभाव पाडला आहे, कारण खुद ख्रिस्तांच्या शिकवणीचा उगम बुद्धदेवांच्या शिकवणीत सापडू शकतो. विज्ञांनाच्या बाबतीतहि हेच खरे आहे. भारताने प्राचीन काळी आरंभीचे शास्त्रज्ञ, वैद्य पुरविले आहेत. आणि सर विल्यम हंटर यांच्या मतानुसार भारताने विविध रासायनिक द्रव्यांचा शोध लावून आणि विद्रूप झालेले कान व नाक कसे दुरुस्त करावे हे शिकवून आधुनिक वैद्य शास्त्रातही भर घातली आहे. गणिताच्या बाबतीत याहून अधिक कार्य केले आहे. बीजगणित. भूमिती, ज्योतिष्यशास्त्र आणि आधुनिक विज्ञांनांचा विजय असे मिश्र गणित या सर्वाचा भारतात शोध लागलेला आहे. एवढेच नाही तर वर्तमानकालीन सर्व सुधारणांची आधारशीला असे जे दहा अंक ते भारतातच शोधले गेले होते. त्याची नावें वस्तुत: संस्कृत आहेत. *तत्वज्ञांनाच्या क्षेत्रात थोर जर्मन तत्वज्ञ शोपेनहॉर यांनीमान्य केल्या प्रमाणे, आम्ही आजही ईतर देशांपेक्षा किती तरी श्रेष्ठ आहोत. संगीताच्या क्षेत्रात भारताने जगाला सात मुख्य स्वर असलेली आपली स्वर पद्धती दिली आहे. भाषाशास्त्रात आमची संस्कृतभाषा हि आता सर्व युरोपियन भाष्यांचा मूळ पाया म्हणून सर्वमान्य झाली आहे. युरोपातील सर्व भाषा ह्या वस्तुत:संस्कृतच्या केवळ अपभ्रष्ट अश्या बोल भाषा आहेत. [विवेकानंद ग्रंथावली ९:३४२] *साहित्यात आमची काव्ये, महाकाव्ये आणि नाटके जगातील कोणत्याही भाषेत ईतकी श्रेष्ठ आहे. एका सर्व श्रेष्ठ जर्मन कवीने आमच्या ”शाकुंतला” चे सार “स्वर्ग आणि धरा यांचे मिलन” या शब्दात वर्णिले होते. भारताने जगाला ईसाप च्या नीतिकथा दिल्या. त्या कथा इसापने एका प्राचीन संस्कृत पुस्तका वरून घेतल्या होत्यां. अरबी भाषेतील सुरस गोष्टी भारताने दिल्या आहेत. तसेच सिंड्रेला व बिन स्टाक्स हि कथा देखील भारताने दिली आहे. * उधोगाच्या क्षेत्रात कापूस, तिळ, यांची निर्मिती प्रथम भारतानेच केली. जडजवाहिराच्या कामात भारत हा निपुण होता. आणि साखर हि भारताची निर्मिती आहे. ‘शुगर’ हा शब्द मुळ भारतीय आहे. बुद्धिबळे, सोंगट्या, पत्ते, हे खेळ भारतानेच शोधून काढले आहेत. वस्तुत: प्रत्येक बाबतीत भारताची श्रेष्टता ईतकी मोठी आहे, त्यामुळे आकर्षित होऊन युरोपातील बुभूक्षितानच्या टोळ्या हिंदुस्थानाच्या किनार्या कडे ओढल्या गेल्या आणि अप्रत्यक्षपणे याचाच परिणाम म्हणून अमेरिका खंडाचा शोध लागला. आपल्या देश्याच्या ईतिहासा कडे पाहता मानवी मनाच्या विकासासाठी ज्याने एवढे भरीव कार्य केलेले आहे. असा दुसरा एकही देश पृथ्वीच्या पाठीवर आढळत नाही. म्हणून या देशाची निंदा कोणीही करू शकता नाही. म्हणून स्वामी विवेकांनदांचे आव्हान आहे कि ”तुम्ही आजवर चांगले केलेले आहे तसेच पुढेही अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा.. [ ग्रन्थावली २:१०९]
Source : Marathi Unlimited.