Adhik Maas : When and Why ?, In the Hindu calendar Purshottam maas occurs as an extra month … [Note that an adhik māsa (month) is the first of two whereas an adhika tithi is the second of … Adhik Maas : When and Why ?
ज्योतीर्मयुख पंचांग पुस्तिकाद्वारे माहिती
अधिकमास, कां.. कसा.. येतो पाहण्याची रिती!चांद्रमान किंवा सौरमान या दोहोंचा मेळ असावा, म्हणून मध्ये ज्या एखाद्या अंमान्त महिन्यात संक्रांत गणली जात नाही, त्या महिन्याला अधिकमास किंवा मलमास म्हणतात. चैत्रापासून अश्विना पर्यंत जे सात महिने, त्यांपैकी बहुत करून एकदा अधिकमास येतो माघमास मात्र कधीच अधिकमास किंवा क्षयमास नसतो, स्थूल मानाने बत्तीस महिने, सोळा दिवस आणि चार घटिका ईतका काळ गेल्या नंतर, म्हणजे दर तिसर्या वर्षी अधिकमासाचा संभव होतो. एकदा आलेला अधिकमास प्राय: पुन:१९ वर्षांनी [त्याच महिन्यातील] येतो. अधिकमास घरण्याचे कारण असे आहे कि, चांद्र वर्षाचे दिवस ३५४ व सौरवर्षाचे दिवस ३६५ असतात: म्हणजे चांद्र मानाचेवर्ष व सौरमानाचे वर्ष या दोहोंत अकरा दिवसाचे अंतर असते. हे अंतर भरून यावे व चांद्र वर्षाचा व सौर वर्षाचा मेळ असावा, म्हणून सुमारे ३३ महिन्यांनी एक अधिकमहिना धरीतात. अधिकमहिन्यास त्याच्या पुढील महिन्याचे नाव देतात. दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास शुभ कर्माला वर्ज्य सांगितला आहे; परंतु ज्या वर्षी क्षयमास येतो, त्या वर्षी दोन अधिकमास येतात; त्यांपैकी क्षयमासा पूर्वी येणारा जो अधिकमास ज्याला संसर्प म्हणतात, तो शुभ कार्यास वर्ज्य नाही. मागाहून येणार्या अधिकमासास अंहस्पती म्हणतात, तो मात्र शुभ कार्यास वर्ज्य आहे.
पूर्वीच्या संवत्सरांत ज्या महिन्याच्या कृष्ण पंचमीस महिन्याची संक्रांती येईल, तोच महिना प्राय:पुढील वर्षी अधिकमास होतो; असे समजावे. तथापि हे स्थूलमान आहे म्हणून पंचमीच्या मागेपुढे एकदोन प्रहर संक्रांतीप्रवेश झाला तरी चालेल. उदाहरणार्थ, ग्रहलाघवाप्रमाणे शके १८५५ संवत्सरांत वैशाख कृष्णपंचंमिस त्या महिन्याची वृषभसंक्रांती आली होती, म्हणून १८५६ संवत्सरात वैशाख हाच अधिकमास झाला. दुसरी रिती म्हणजे अशी कि —- शालीवाहनशकास १२ नी गुणून त्या गुनाकारास १९ सांनी भागावे. आणि शेवटी बाकी राहील ती जर ९ किंवा ९ च्या आंतील एकदा अंक असेल तर त्या वर्षी अधिकमास पडेल असे समजावे. तसेच चैत्रादी बारा महिन्यातून कोणता महिना अधिकमास होईल, हे समजण्याची रिती अशी आहे कि, (१९ सांनी भागल्या नंतर) भागाकाराची बाकी जर पांच किंवा पांचा पेक्षा अधिक असेलतर त्यातून दोन वजा करावे, आणि पांच अंकाच्या आंत असेल तर एक वजा करावा. बाकी जो अंक राहील तो चैत्रामहिन्या पासून मोजून अधिकमास समजावा, तथापि हि रिती स्थूल मानाचीआहे, या रीतीने कधी कधी थोडा फरक पडतो. उदा. शके १८३१ या वर्षी वरील रीतीने भाद्रपद हा अधिकमास होता,पण त्या वर्षी सूक्ष्म गणितांने श्रावन अधिकमास आला होता. तसेच क्षयमासामुळे तिथीत बदल होत असतात याकरिता मागील वर्षातील व पुढील वर्षातील अधिकमासाचा तक्त्ता पुढे पाहू —-
मागील वर्षे, ( १८५८ भाद्रपद ) — ( १८६१ श्रावण )—( १८६४ ज्येष्ठ )–( १८६७ चैत्र )—(१८६९ श्रावण )—(१८७२ आषाढ )—(१८७५ वैशाख )—(१८७७ भाद्रपद )—(१८८० श्रावण )—(१८८३ ज्येष्ठ ) (१८८६ चैत्र )—( १८८८ श्रावण )—(१८९१ आषाढ )—(१८९४ वैशाख )—(१८९६ भाद्रपद )—(१८९९ आषाढ )—(१९०२ ज्येष्ठ)—(१९०४आश्विन )—(१९०७ श्रावण )—(१९१० ज्येष्ठ ) (१९१३ वैशाख)—(१९१५ भाद्रपद )—(१९१८ आषाढ )—(१९२१ ज्येष्ठ)—(१९२३ आश्विन )—(१९२६ श्रावण )—(१९२९ ज्येष्ठ )—(१९३२ वैशाख )—( १९३४ भाद्रपद )
पुढील वर्षे –(१९३७ आषाढ १७ जून ते १६ जुलाई ) —( १९४० ज्येष्ठ, १६ मे ते १३ जून)—( १९४२ आश्विन, १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर)—( १९४५ श्रावण १८ जुलाई ते १६ ऑगष्ट) याप्रमाणे
क्षयमासा विषयी यापूर्वी माहिती सांगितलेली आहे.
कोणतेही संकट, कामनाकिंवा लाभ परिपूर्ण होण्या करीता ईश्वराला विनंती, आराधना करणे हाही उद्धेष ठेवून व्रत केल्या जाते. तसेच अधिक मासातही व्रत केल्या जातात. या महिन्याला पुरुषोत्तम मासं संबोधतात. बर्याच ठिकाणी असे प्रश्न उद्भवताना दिसतात कि व्रते आली कुठून ?व्रत म्हणजे काय? परंतु याचा शोध घेतल्यास प्राचीन वाड्मयात बरेच संदर्भ आढळून येतात ‘व्रत’ या शब्दाचा अर्थ अनुकरण करणे असा होतो, किंवा अर्थ निवडणे असाही होतो. बृद्धारण्यकोपनिषदान ऋषींनी व्रताची कथा अशी सांगितला कि प्रजापतीने [शिव] मानवी देहाच्या अनेक अवयवांची निर्मिती केली. परंतु या अव्य वांत भांडणे तयार झाली.त्याचा परिणाम म्हणजे तोंड म्हणाले मी फक्त बोलणार बाकी काहीही करणार नाही, अश्या प्रकारे प्रत्येक अवयव आपापल्या मर्जी नुसार वागू लागला. त्याचा परिणाम संपूर्ण देहावर झाला, तेव्हा या अवयवानसाठी व्रत निर्मिती करावी लागली, हेच एक नेमस्त पणाचे, शरीरावर व मनावर नियंत्रण ठेवण्याचे एकमेव साधन त्यांना सुचले. असे म्हणतात. हा मास सर्व मासात श्रेष्ठ समजल्या जातो. म्हणून या महिन्यात दान धर्म करून पुण्य पदरी पाडून घ्यावे हा मासं भगवान श्री कृष्णाचा आवडीचा असल्या कारणाने याला ”पुरषोत्तम मासं” म्हणतात. या महिन्यात श्री कृष्णाची पूजा होते, म्हणतात कि आपल्या कडून काही पातक किंवा वाईट कृत्ये घडली असल्यास या महिन्यातील पूजे द्वारे त्या पापांचे खंडण होवून मोक्ष प्राप्ती होते.
हे व्रत करणाऱ्यांनी राधाकृष्णाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करून. पूजा अर्चन करून निरंजन लावावे, उदबत्तीचा, धुपाचा, सुगंध दरवळीत ठेवावा. या व्रताने दुख: चिंता, दारिद्र्य नष्ट होते. संकटाला सामोरे जाण्याचे ध्यर्य प्राप्त होते मनोबल वाढते. या महिन्याचे व्रत काही कठीण नाही.या महिन्यात व्रतस्त: असताना भांडण तंटा करू नये.व्यसनापासून दूर राहावे. उपवास करावा, दुध किंवा फलाहार करावा. ब्रम्हचर्य व्रत्त पाळावे. परान्न घेवू नये. केळीच्या पानावर आहार घ्यावा. आणि शक्यतोवर जमिनीवर झोपावे. हे व्रत चालू असताना भागवत पारायण करावे. श्रीकृष्णाला तुळसदल अर्पण करावे, पूजा करावी. दानधर्म करावा. कोणत्याही प्रकारे दुध, तूप, धान्य, घंटां, दिवा, किंवा फळे दान द्यावी, यथाशक्ती मातीचे किंवा तांब्याचे कुंभ दान करावे. व्रताचे उद्यापन यामहिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी, अष्टमी, किंवा नवमी ला करावे, ३३ किवा ५ मेहून जेवायला घालावे, त्याना ३३ अनारसे भरलेले भांडे, तसेच खीरीचे जेवण घ्यावे. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. यथाशक्ती चांदीच्या ताटात ३३ अनारसे, भरून मध्यभागी निरांजन लावून, हे ताट व दक्षिणा वाण म्हणून द्यावी, दीपदाण व दक्षिणा देणे महत्वाचे मानले जाते. छिद्र असलेला पदार्थ वाण म्हणून देणे योग्य आहे, जेवढी छीद्रे असलेला पदार्थ असला तेवढ्या अगणीत वर्षाचे अधिक महिन्यातील वाणाचे पुण्य लाभते, चांदीचे तुलसपत्र देण्याची प्रथा आहे. या मासात मंगळवारी किंवा शुक्रवारी ३३ बायकांना बोलावून हळद कुंकू करावे साखर खोबरे द्यावे, शक्य असल्यास नारळाची ओटी भरावी, या मासात जमत असल्यास दररोज नदीवर आंघोळ करावी, एखादेवेळी तीर्थयात्रा किवा दररोज देवदर्शन करावे, मात्र या महिन्यात .कोणतेही शुभ कार्य, घृह प्रवेश, वास्तू शांती, विवाह, नामकरण वै. विधी टाळावीत.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited Articles.













