समस्या प्रथमच शाळेत जाणारया मुलांच्या




Like
Like Love Haha Wow Sad Angry

samasya-prathamach-shalet-janarya-mulanchi Doghachahi swabhav ekmekana aavadala, shalet jayachya velelach te gele  Bulla barka zala hota mhanun to kakuni tondat ghetala, prathamach vel hotach na mulinchi tar line lagali aasati, pan shikshnat aadachan nako …

||  श्री गणेशा ||  पालकांच्या आणि मुलांच्या शाळेचा.

 प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला शाळेची  गोडी लागावी म्हणून नाना परीचे उपाय करावे  लागतात. तरी पालक म्हणून कुठे तरी कमी    पडत असल्याची बोच जाणवतेच. अश्या  परिस्थितीत काही नियम बनवायला हवेत. जे  तुमच्या पाल्याच्या दृष्टीने फायद्याचे. व  शाळेत जाण्यास सुखकर होतील. * जून महिना  आणि शाळा हे समीकरण कित्तेक वर्षा पासून  आपल्यात रुजलेल आहे पण प्रथम शाळेत  जाण्याऱ्या मुलांचे काय? शाळेत जायचे नाव  काढले कि, आनंदित होणारी मुले, पण त्यांच्या  डोळ्यातील पाउस नक्कीच अनुभवायला  लावतात. त्या करिता हि शाळेची रंगीत तालीम  शाळा सुरु होण्या पूर्वी करून घेतल्यास  पालकांना हा अनुभव जास्त जड जाणार नाही, * प्रथम नवीन ब्याग, नवा गणवेश, नवीन पुस्तक या सर्व वस्तुं मध्ये उत्सुकता दिसते, पण शाळेत पाऊल ठेवताक्षणी टीचर, ईतर रडणारी मुले, सोडून जाणारे आईबाबा पाहून त्यांना एकूण परिस्थिती लक्षात येते. मग सुरु होते रडारडी. अश्या गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर येण्या करिता काही नियम करून बघा.

* प्रथम शाळेत जाणारया  मुलांना शाळेची धास्ती वाटू नये या करिता. आधी काही दिवस शाळेच्या आवारात फिरायला घेऊन जावे, त्याच्याशी बोलताना तुझी शाळा, म्हणून शाळेतील मज्जा, मित्र मैत्रिणी यां बद्दल जरूर चर्चा करावी. या मुळे मुल शालेबाब्तीत सकारात्मक विचार करतील आणि त्यांना पहिल्या दिवशी शाळा अनोळखी वाटणार नाही. * शाळेत प्रथम अभ्यास घेतला जातो खरतर बर्याच पालकांची तशीच अपेक्षा असते. मुलांना ए, टू झेड लिहिता येण, एक ते शंभर अंक येण, हा त्यातला महत्वाचा अभ्यास. पण शाळेत गेल्या गेल्या अभ्यासाची सक्ती करू नका. प्रथम त्यांना आवडणारा विषय बघा, चित्रकला, गाणे, थोट्या गमतीदार गोष्टी वै. यावर भर देऊन, शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेता त्यांना थोडा वेळ लागतो. तशी त्यांची आकलन शक्ती अफाट असते. पण प्रथम शाळेची गोडी लागणे तितकेच महत्वाचे आहे. फक्त अभ्यासच करण्यासाठी आपण मुलांना शाळेत पाठवतो कां ! याचा विचार पालकांनी करायला हवा. सुरूवातीस मुलांच्या सोबत आभ्यासाबाबत बोलणे टाळावे, मित्र, खाऊचा डब्बा, मौज, ही चर्चा करावी आणि काही विचारणा केली तरी उत्तराची अपेक्षा करू नका. दोन तास शाळेत घालविल्या नंतर तो विषय त्यांना उदासवाणा वाटतो, अभ्यास या विषया मुळे शाळेत जाण्याची उत्सुकता कमी होईल तेव्हा त्याला प्रथम शाळेची गोड्वाई येऊ द्या. एकदा शाळेत मन रमल्या नंतर अभ्यास विषया कडे वळा. नाहीतर शाळा याविषया सोबत त्याच्यात आभ्यासा बद्दलची उदासीनता तयार होईल. पुन्हा ती शाळे बद्दल काहीच सांगणार नाही.  *मुलांना त्यांच्या रोल मॉडेलच प्रचंड आकर्षण असत, किंबहुना त्यांचा बर्यापैकी पगडा मुलांवर पडतो. {उदा. डोरेम्यान, सुपरम्यान, स्पायडरम्यांन} त्यांची मध्यस्थी घेऊन ते नेहमी शाळेत जात. कधीही रडत नाही ते टिफिन पूर्णत:संपवितात. असे सांगून चांगल्या सवयी त्यांच्याकर बिंबविण्याचा जरूर प्रयत्न करा. प्रथम शाळेत जाताना त्याचं रडण साहजिक आहे.त्यासाठी मारणे, ओरडणे,ही कृती करू नका. * त्यापेक्षा त्याला तो शाळेत न गेल्यास तू कोणत्या गोष्टीस मुकणार आहेस हे त्याला समजावून सांगा. उदा. तुला नवीन मित्र मैत्रिणी मिळणार नाही शाळेत टीचरने शिकविलेले चित्र रंगविणे, नवीन खेळ, नवीन गंमतीयातील काहीच तुला येणार नाही. अश्या शब्दात त्याला सांगावे लागेल. तेव्हा मुले, शाळेत जाण्यास उत्सुक होतील. * शाळेत जायचं  नाही म्हणून कधी कधी हट्ट धरतात. शाळेच्या गेट पर्यंत सर्व काही सुरळीत असत. पण आत जायच्या एनवेळी ते नाराजी दर्शवितात कधी रडतात. या क्षणाला तुम्ही गोडी गुलाबीन शाळेत पाठवण अपेक्षित असताना. मुल या क्षणाचा बरोबर फायदा घेतात. ते काही तरी मागणी घालतात. तेव्हा वेळे पुरती त्यांना समजाविणे व राजी करणे तितकेच महत्वाचे असते. मुले कधीही गोड भाषेतच  समजतात हे लक्षात घेणे, *शाळेत त्याला कुणा सोबत जायचं याची कल्पना अगोदर द्या. आटोत पाठ विण्याचे असल्यास आटो चालकाशी प्रथम परिचय  करून द्या. * जर शेजारची मुले मुली त्याच शाळेत असतील तर त्यांच्या सोबतचा परिचय अगोदर असू द्या.परिचयाची मुले सोबत असताना त्यांना शाळेत जाने मजेशीर वाटेल.

Source : Marathi Articles.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा