एक स्वप्न मुलांचे बघायला सुंदर..




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Get-set-ready-for-college more about what she needs to do and learn, check out Get Ready, Get Set! Getting ready for college is a lot like getting ready for school in ..

                एक स्वप्न मुलांचे बघायला सुंदर, पण सांभाळायला अतिशय कठीण.

                           ###  मुलांचे गेट रेडी फॉर कॉलेज! ###get set ready for collegeदहावीच्या निकाला नंतर महाविद्यालयीन जीवनाची आतुरतेने वाट बघणारे बरेच विद्यार्थी लवकरच महाविद्यालयीन आयुष्याची सुरवात करणार आहेत. सुरवातीला धडधडत्या अंत:करणाने कॉलेजच्या आवारात पाऊल टाकल्यावर कॉलेजच्या रंगात असे काही रंगून जातील कि ते दिवस संपल्याचे कळणारही नाही. एकीकडे टीवाय आणि मास्टर्सची परीक्षा देऊन महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणींची शिदोरी घेऊन अनेकांनी आपल्या कोलेज लाईफचा निरोप घेतला असेल तर दुसरीकडे दहावीच्या निकाला नंतर महावीद्यालया सरसावलेले, महाविद्यालयीन जीवनाची आतुरतेने वाट बघणारे अनेक विद्यार्थी लवकरच पुढल्या आयुष्याची सुरवात करणार आहेत.

* आईच्या मायेने प्रत्येक गोष्ट खाऊच्या घासाप्रमाणे मुखाशी आणून देणाऱ्या शाळेची साथ सरली. याची हुरहूर जरी मनात उठत असली तरी दुसरीकडे ताई-दादानं कडून आज पर्यंत ऐकलेल्या कॉलेजच्या गमती-जमती, ती सगळी धम्माल, मजामस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार असल्याने एक प्रकारची एक्साईटमेंट नवख्या कॉलेजवीरांच्या मनात आहे. लेक्चर, बकिंग, क्यंटिंमधली घम्माल, कॉलेज मघुन मुव्हीला जाण, आज पर्यंत हे सारकाही ऐकल होत, शिवाय यापुढे युनीफार्म नसणार दर वर्षीसारखे दोन युनिफार्म खरेदी करण्याची गरज नाही, रोज नवनवीन प्रकारचे कपडे घालून मिरवायला मिळणार म्हणून मुलांची जरी चंगळ असली तरी पालकांच्या खिशाला दरवर्षीच्या तुलनेने यंदा जास्त फोडणी बसणार आहे यात काही शंका नाही. कारण दोन तीन जीन्स अथवा ट्राऊझर्स, त्यावर सूट होणारे टी-शर्ट, कुर्ती त्याला म्यचं असे स्यन्डल, नवीन बस्ते, ब्याग यांसाठी त्यांना पैसे द्यावे लागणार आहे.

* अनोळखी वातावरण, अनोळखी जग, त्यात सगळा वेगळा अभ्यास… यासाऱ्या वातावरणात आपल कसं होणार ? हा प्रश्न अधून-मधून मनात काहूर माजवत असतो. त्यामुळे थोडासा का होईना पण एक प्रकारचा नर्व्हसपणा आलेला असतो.

* बट फ्रेंड्स, नॉट टु वरी, धडधडत्या अंत:करणाने कॉलेज आवारात पाऊल टाकणारे तुम्ही या कॉलेजच्या रंगात असे काही रंगून जाल कि पुढची वर्ष कघी संपून जातील हे कळणारच नाही. कघी तर अल्पावधीतच जिवाभावाच्या, आपल्याच विचारांच्या कितीतरी मित्र-मैत्रिणी मिळतील.नात्य मंडल, वाड्मय मंडळात रमून जाताना हळूहळू शालेय जीवनातील आठवणी हृदयाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त होतील आणि मग जेव्हा टीवायचं वर्ष येईल तेव्हा कॉलेज जीवन संपणार ही कल्पनाच करवणार नाही. पण ते जाऊच द्या !

* सो गाईज बी बिनधास्त, कॉलेज लाईफ एन्जॉय करायला तैयार व्हा. अर्थात एन्जॉयमेंटच्या नावाखाली आपण काहीतरी अयोग्य किंवा अवैध तर करीत नाही नां याची मनोमन कल्पना असू द्या व खात्री करून घ्या. वाईट व्यसनं आणि प्रलोभनं या पासून दूर राहा. आणि वाईट संगतीत आल्यास त्वरित सावध व्हा. यासाठी आपल्या जेष्टांची मदत घेण्यास संकोच करू नका.या व्यतिरिक्त काही अडचणी आल्यास, घरी सुसंवाद साधण्यास घाबरू नका. वेळेची दखल घ्या आणि सर्वात  महत्वाचं म्हणजे अभ्यास. त्यामुळे त्याकडे दूर लक्ष करून चालणार नाही.पण टेन्शन घेऊ नका…….. सो जस्ट गेट, सेट, गो फॉर कॉलेज.

Source : Marathi Articles.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu