31
ज्योतीर्मुख — बालकाचे नावं ठेवणे. [ बारसे ]
ज्या नक्षत्रावर बालकाचा जन्म झाला असेल. त्या नक्षत्राच्या. आरंभापासून समाप्तीपर्यंत घटिका मोजून त्याचे चारभाग करावें. प्रत्येक भागाला चरण असी संज्ञां आहे ज्या चरणावर जन्म झाला असेल त्या जन्म नक्षत्राच्या चरणाचे जे अक्षर असेल, ते नावाचे आद्याक्षर असावे. उदारणार्थ शततारका नक्षत्र एकंदर ६४ घटिका आहे. व त्या नक्षत्राच्या ५ घटिका गेल्या नंतर म्हणजे पहिल्या चरणावर बालकाचा जन्म झाला असे समजा. शततारका नक्षत्राच्या प्रथमचरणाचे अक्षर ”गो” असे आहे म्हणून मुलगा असल्यास ”गोपाला”व मुलगी असल्यास” गोदावरी ”वै. नावे ठेवावी. जन्म काळी ज्या राशीला चंद्र असतो तीच त्या मनुषाची रास जाणावी.
Source: Marathi Unlimited.
31