संसदेची विशेष संयुक्त बैठक!




आज संसदेची विशेष संयुक्त बैठक!

संसदेच्या ६0 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या, रविवार दि. १३ रोजी सकाळच्या सत्रात दोन्ही सभागृहांची विशेष बैठक तर सायंकाळी संयुक्त बैठक होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दोन्ही सदनांची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी राज्यसभा व लोकसभेची संयुक्त बैठक केंद्रीय सभागृहात होणार आहे.

दोन्ही सदनाच्या बैठकीत ‘भारतीय संसदेचा ६0 वर्षांचा प्रवास’ या विषयावर चर्चा होणार आहे. लोकसभेत सदनाचे नेते प्रणव मुखर्जी तर राज्यसभेत सदनाचे नेते पंतप्रधान मनमोहन सिंग चर्चेला प्रारंभ करतील.

याशिवाय आणखी पाच पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. त्यात ‘संविधान सभेच्या महिला सदस्यांची निवडक भाषणे’ समाविष्ट आहे. संसदेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, सतारवादक देबू चौधरी, कर्नाटक शास्त्रीय गायक महाराजपुरम रामचंद्रन, प्रख्यात गायिका शोभा मुद्गल, इकबाल खान आपली कला सादर करणार आहेत.

संसदेच्या ६0 व्या वर्धापन दिनानिमित्त पाच व दहा रुपयांचे विशेष नाणे आणि डाक तिकीट राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जारी केले जाणार आहे. याशिवाय राष्ट्रपतींच्या हस्ते तीन पुस्तकांचे लोकार्पण केले जाईल. ‘सदस्यांचा परिचय : पहिली लोकसभा’, ‘लोकसभेचे अध्यक्ष’ व ‘लोकसभेची ६0 वर्षे : एक विश्लेषण ’ अशी ही तीन पुस्तके आहेत. लोकसभा सचिवालयाने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड