We all know that coconuts are very useful for our body. coconuts are useful in pregnancy. read more about the uses of coconuts..
पृथ्वी वरील कल्प वुक्ष म्हणजे नारळाचे झाड. नारळ हे फळ म्हणजे, स्वयंपाक असो पूजा असो किंवा चौकटीतील सायंकाळ असो याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. औषधात नारळाचे फळ, नारळाची शेंडी, नारळाचे कोंब, कोवळी फुले वैगरे.
वापरली जातात. नारळाचे फळ चवीला गोड असते. गुणांनी सिग्ध व गुरु असते. तर शीत वीर्याचे असते पित्त दोषाचे शमन करते, टाकत वाढवते. मास धातूचे पोषण करते . हुदयाला हितकर असते व मूत्राशयाची शुद्धी करते. नारळ वात दोषाचे शमन करते नारळाचा फळाच्या तीन अवस्था आहेत. १ -बाल, २ -मध्य, ३-पक्व
बाल :- यात फक्त पाणी असते,
मध्य :- पाणी व मऊ सायी सारखा गर असतो.
पक्व :- पाणी कमी होतें, तर गर घट्ट व जड होतें शेवटी पाणी पूर्णत; आटुन जाते खोबऱ्याचा गोटा शिल्लक राहतो.
पातळ मलई सारखे खोबरे असलेले शहाळे चवीला अतिशय गोड व तृप्ती करणारे असते उन्हाळा च्या दिवसात शहाळ्याचे पाणी तहान तर भागवते व उष्णतेमुळे थकलेल्या शरीरधातूनाही पुन्हा टवटवीत करू शकते. शहाळ्याचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते शरीरात चटकन स्वीकारले जाते व शरीरातल्या जलान्शाची ताबडतोब पुर्ती करू शकते. जुलाबामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणूनही शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम असते. उष्णतेमुळे लघवीत होणारी जळजळ थांबते शरीरातील विष द्रव्ये निघून जाण्यासाठी नियमित शहाळ्याचे पाणी प्यावे. गर्भवती साठी शहाळ्याचे पाणी उत्तम आहे तसेच थकलेल्या मनाला व मेंदूलाही स्पुर्ती देणारे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, ताण असणारया बुद्धी जीवी व्यक्तींनी अधून मधून शहाळ्याचे पाणी पिणे योग्य होय. तसेच पित्त दोष असल्यास पोटाची जळजळ थांबविते .तसेच पोटातील जंत नाहीसे. करण्यासाठी अंशापोटी नारळाचे दुध घ्यावे व नंतर तासाभराने प्रकृती नुरूप २-३ चमचे एरन्डेल घ्यावे याने जुलाब होऊन जंत पडून जातात. तसेच केस गळत असल्यास नारळाचे दुध केसांच्या मुळाशीअर्धा तासासाठी लाऊन ठेवावे व नंतर शिकेकाई किंवा नागरमोथा मिश्रनाणे धुवावे ओले खोबरे आरोग्यासाठी चांगले असते खोब्र्यातील स्निग्ध गुणांमुळे आतड्यांतील नाजूक श्लेष्मल आवरणाचे रक्षण होतें. नारळाच्या दुधाप्रमाणे शहाळ्यातील खोबरे अतिशय पौस्टिक व विशेषत: मासधातूची टाकत वाढविणारे असते सातत्याने संगणकावर किंवा उन्हात, प्रखर दिव्यांच्या उजेडात काम करावे लागणाऱ्यांनी शक्य तेव्हां शहाल्यातील पातळ खोबरे खाण्याची सवय ठेवल्यास डोळ्यांची आग होणे डोके दुखणे, चक्कर येणे, वैगरे त्रास दूर राहण्यास मदत मिळेल. सधातुमुळे शहाल्यातील मलई शुक्र धातुसाठी पोषक असते त्यामुळे गर्भ धारणेसाठी स्री-पुरुषांनी शहाळे खाणे हितकर ठरते. शहाळ्याची मलई त्वचेसाठी उत्तम असते. चेहरा हातापायाची तळवे यावर शहाळ्याची मलई चोळून लावल्यास त्वचेचा ख्र्खर्प्ना दूर होतो, त्वचा उजळते व अकाली सुरकुत्यांना प्रतिबंध होतो. नारळाची क्र्वन्ति देखील उपयुक्त असते. करवंटी पासून तेल मिळू शकते हे तेल त्वचा विकारासाठी उपयोगी पडते .करवंटीचे. वस्त्र गाळ चूर्ण हिरड्यांवर लावले असता हिरड्या घट्ट होतात हिरड्यांतून पुरक्त वैगरे होणे थांबते. नारळाच्या करवंटीला जाळून केलेली राख खोबरेल तेलात टाकून केलेले मलम जखमेवर लावतात. नारळाची शेंडी तव्यावर जाळून केलेली राख मध सोबत थोडी थोडी चाटल्यास उलट्या होणे बंद होतात.
नारळाची फुले गर्भाशयाची टाकत वाढविणारी असतात त्यामुळे बाळंतपनातही घेता येतात. लहान मुलांच्या त्वचेच्या मालिश करिता खोबरेल तेल वापरणे हितावह असते. शुद्ध खोबरेल तेल स्वयंपाकासाठी दक्षिण भारतात पूर्वी पासूनच. वापरतात यापासून चरबी कमी होतें रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसेच यापासून बरेच वेगवेगळे पदार्थ बनविण्यात येतात. असा हा गुणकारी नारळ आपल्याला श्रीफळ म्हणून लाभलेले आहे.
1 Comment. Leave new
dhanyawad…………..marathi unlimited