How Human body works. The factory is human body and there functionality is great. please read this for good tips on human body.
मानवी शरीराची अनेक विभाग असलेला एका कारखान्याशी तुलना करता येईल. या कारखान्यात अनेक कामे सुरळीत पार पडत असतात. मानवाच्या शरीरातील यंत्रणांची मानवनिर्मित यंत्रांशी तुलना केली तर त्याचे महत्व अधिक जाणवते. उदारणार्थ, मानवी शरीरातील यकृतात ४२५ पेक्षा अधिक रसायनांची निर्मिती होते. यापैकी बरीच रसायने कृत्रिमरित्या बनवता येत नाही. ही रसायने शरीरात आलेल्या अन्नावर प्रक्रिया करण्याचे काम करतात. मानवी शरीरातील हृद्य हेही असेच एक आश्चर्यचाकीत करणारे यंत्र. हृद्य संपूर्ण शरीरातून रक्त खेचून घेवून तसेच ते पुन्हा शरीरातील विविध भागांना पुरवण्याचे काम अव्याहतपणे करत असते. ते एकार्थी पाणी उपसण्यासाठी विहिरीवर बसवलेल्या पंपासारखेच काम करत असते. मानवी हृद्य विहिरीवर बसवले तर ते कैक महिने ५० एकर शेतीला पुरेल इतका पाण्याचा पुरवठा करू शकेल. संशोधकांनी मानवी डोळ्यांची रचना लक्षात घेवून कॅमेराचा शोध लावला. मानवी डोळे एखाद्या कॅमेरा प्रमाणेच काम करत असतात. ते दिवसभर काही लाख फोटो घेण्याचा काम करतात. आज प्रचलित असलेल्या दराने डोळ्यांनी घेतलेल्या फोटोंची किमत ठरवायची तर ती लाखो रुपयांच्या घरात जाते.
मानवी शरीरातील मूत्रपिंड रक्तातील दुषित घटक दूर करण्याचे काम करत असतात. एखाद्या रुग्णाचे मूत्रपिंड बिघडले तर त्याला डायलीसीसवर ठेवले जाते. म्हणजेच मूत्रपिंडाचे काम यंत्राद्वारे पाडले जाते. प्रत्येक डायलीसीस उपचारासाठी जवळपास एक ते दोन हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच आपली मूत्रपिंडे दररोज हजारो रुपयांचे काम करते. मानवी मेंदू हि तर विस्मयकारी यंत्रान आहे. संशोधकांनी एकदा मानवी मेंदूचा कार्याक्षमतेचा आढावा घेतला तेव्हा त्यांना मेंदूमध्ये शेकडो संगणकात मावणार नाही इतक्या माहितीचा साठा करण्याची क्षमता असल्याचे आढळले. दुर्दैवाने मानवाला या नैसर्गिक देणगीची जाणीव नाही. एक उत्तम शरीर वाट्याला आल्याबद्दल तो कृताध्नता तर बाळगत नाहीच; परंतु जमेल तेव्हा या यंत्रावर अत्त्याचारही करत असतो. धुम्रपान, मध्यपान, अनियमित भोजन, व्यायामाचा अभाव यामुळे शरीराचे अपरिमित नुकसानच होत असते. एखादी व्याधी उधभवल्यानंतर मानवाला शरीराचा दुरुपयोग केल्याबद्दल पश्याताप होतो, मात्र तो पर्यंत वेळ निघून गेली असते.
Source :
Marathi Unlimited
1 Comment. Leave new
abobo..ha tar farach gajabcha karkhana ahe.