झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत तुमच्यासाठी खास




Like
Like Love Haha Wow Sad Angry

सकाळी उठल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते आणि रोजचा प्रश्न असतो तो म्हणजे आजचा नाश्ता काय? तेच तेच पोहे आणि उपमा, डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी अगदी कितीही घाई असली तरीही पटकन असा नाश्ता बनवू शकता. सध्या आपण सगळेच घरी आहोत आणि त्यामुळे घरातून काम करत असलो तरीही सकाळचा नाश्ता करणं हे आवश्यकच आहे. तोदेखील चविष्ट आणि तुमच्या आरोग्यासाठी उपयोगी असेल असा नाश्ता. सकाळी उठल्यानंतर नेहमी हेल्दी खावं असं सांगण्यात येतं. तसंच भरपेट नाश्ता केला तर दिवसभर तुम्ही उत्साही राहाता. ऑफिसला जातााना आपल्याकडे इतकी धावपळ असते की, सर्व साग्रसंगीत करायला वेळ नसतो मग अशावेळी कधीतरी केवळ ब्रेड बटर अथवा चहा, कॉफी आणि टोस्ट अशा प्रकारचा नाश्ता करून लोक घराबाहेर पडणं पसंत करतात. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे आपण सगळेच घरी आहोत. पण तरीही घरातून काम करत असल्यामुळे वेळ वाचवणंही आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा झटपट नाश्ता रेसिपी सांगणार आहोत. ज्या पटकन होतील. तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वही मिळतील आणि तुमचं पोटही भरेल. त्याशिवाय तुम्हाला स्वतःलादेखील या रेसिपी बनवून घेता येतील. नाष्टा पदार्थ अनेक असतात. पण गुगल सर्च करतानाही नाष्टा रेसिपी मराठी मध्ये आपण शोधतो. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ इथे देत आहोत जे घरात पटकन बनतात. चला तर मग वाट कसली बघताय? हे वाचून रोज करा वेगवेगळा नाश्ता.

1)तांदळाची उकड (Tandalachi Ukad Recipe)
बऱ्याच जणांना हा प्रकार माहीत नाही. पण हा आंबटतिखट प्रकार सकाळी खाल्ल्याने पोट व्यवस्थित भरलेलं राहतं आणि तुमच्या जीभेवर चांगली चवदेखील तरळत राहाते. शिवाय हे पटकन तयार होतं आणि हे करत असताना तुम्ही तुमची इतर कामही बाजूला करू शकता.

साहित्य –
2 ग्लास ताक
2 मोठे चमचे तांदूळ पीठ
2 हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
2-3 लसूण पाकळ्या
थोडंसं किसलेलं आलं
चिमूठभर साखर
फोडणी
तेल

उकड बनवण्याची पद्धत 

Step 1: आलं – लसूण पाकळ्या आणि मिरच्या एकत्र ठेचून घ्या.

Step 2: ताकामध्ये हे घाला.

Step 3: त्यामध्ये मीठ, साखर आणि तांदूळ पीठ घालून नीट मिक्स करून घ्या.

Step 4: हे मिश्रण जास्त घट्ट अथवा जास्त पातळ ठेवू नका. दुसऱ्या कढईत एक चमचा तेल घाला.

Step 5: त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या.

Step 6: लगेच वरून हे तयार मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा.

Step 7: एक कड काढून त्यात कोथिंबीर घाला. थोडं पातळ आणि घट्ट असं हे मिश्रण ठेवा.

Step 8: त्यानंतर शिजल्यावर काढून डिशमधून खायला घ्या.

Step 9: खाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा याबरोबर वरून कच्चं तेल घातल्यास, त्याची चव अधिक चांगली लागते.

2) फोडणीचा पाव अथवा ब्रेड (Phodni Pav Recipe)
ब्रेड अथवा पाव नुसता सकाळी नाश्त्याला खाण्यापेक्षा तुम्ही त्याला फोडणी देऊन खाल्लंत तर अधिक चांगली चव येते. शिवाय यामध्ये तुम्हाला हवे तसे हेल्दी पदार्थ तुम्ही घालू शकता.

साहित्य –
ब्रेड अथवा पाव (तुमच्या अंदाजाप्रमाणे)
तेल
कांदा
फोडणीचं साहित्य
चवीनुसार मीठ
मिरची
कोथिंबीर

फोडणीचा पाव बनवण्याची पद्धत –

Step 1: ब्रेड अथवा पाव व्यवस्थित कुस्करून घ्या

Step 2: मीठ त्यावरच तुमच्या अंदाजानुसार घाला.

Step 3: मिरचीचे तुकडे करून घ्या.

Step 4: एका कढईत तेल ओता.

Step 5: त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता घाला, त्यात चिरलेला कांदा आणि मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या.

Step 6: कांदा शिजत आल्यावर वरून ब्रेड अथवा पावाचा चुरा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

Step 7: चिरलेली कोथिंबीर वरून पेरा आणि एक वाफ काढून गरमगरम ब्रेड वा पाव सॉसबरोबर खायला द्या.

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

3)मटर चाट (Matar Chaat Recipe)
सकाळी अथवा संध्याकाळी नाश्त्यासाठी मटर चाटसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. तेसुद्धा अशावेळी जेव्हा तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो. पटापट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. हे चाट सगळयांनाच आवडतं.

साहित्य –
वाटाणे (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा)
बटाटे (उकडवून घ्या)
कापलेला बारीक कांदा
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
जीरे पावडर
धने पावडर
तिखट
लिंबू

मटर चाट बनवण्याची पद्धत

Step 1: रात्रभर पाण्यात वाटाणे भिजवून ठेवा.

Step 2: नंतर बटाटे आणि वाटाणे वेगवेगळ्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये शिजवून घ्या. बाहेर काढल्यावर व्यवस्थित बटाटे कुस्करून घ्या.

Step 3: वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसं मीठ घालायला विसरू नका

Step 4: त्यानंतर वाटाणे आणि बटाटे मिक्स करा.

Step 5: त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट, लिंबाचा रस, धने आणि जिरे पावडर अथवा चाट मसाला घाला.
हवं असल्यास, पापडाचा चुरा आणि गोड अथवा तिखट चटणीदेखील तुम्ही मिक्स करू शकता. याची अप्रतिम चव लागते.

4)व्हेज मेयो सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe)
या सँडविचसाठी आपण बरेच पैसे मोजतो. पण हे बनवायला अतिशय सोपं आहे आणि नाश्त्याला खाल्ल्यानंतर जास्त  भूक लागत नाही. याची रेसिपीदेखील क्विक आहे.

साहित्य – 

    ब्रेड
    मेयो सॉस
    कांदा, टॉमेटो, काकडी, गाजर
    काळी मिरी पावडर
    चवीनुसार मीठ
    केचअप

मेयो सँडविच बनवण्याची पद्धत – 

Step 1: एका बाऊलमध्ये मेयो सॉस काढून घ्या.

Step 2: त्यात कापलेला कांदा, टॉमेटा, काकडी, गाजर हे सगळं मिक्स करा.

Step 3: त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि हवं असल्यास, चाट मसाला घाला.

Step 4: हे नीट मिक्स करून घ्या.

Step 5: आता ब्रेडचे काप घ्या. त्याच्या कडा काढून टाका.

Step 6 : नंतर वरील मिश्रण त्या स्लाईसवर नीट लावा. दुसरा ब्रेड त्यावर ठेवा.

Step 7: दोन्ही बाजूने ब्रेडला बटर लावा आणि मग मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करा अथवा तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या आणि केचअपबरोबर खायला घ्या.

5)शेवयांचा-उपमा-(vermicelli-upma-recipe)


शेवयांचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला हा बनवणंदेखील अतिशय सोपं आहे. तसंच अगदी कमी वेळात हा नाश्ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही.

साहित्य 
शेवया
कांदा, टॉमेटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर
कोथिंबीर
मिरची
चवीनुसार मीठ
फोडणीचं साहित्य

शेवयांचा उपमा बनवण्याची पद्धत

Step 1: एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा.

Step 2: त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळलं अर्थात शेवया शिजल्या की पाणी काढून टाका.

Step 3: नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या.

Step 4: त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा. मग तुम्हाला हव्या त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला.

Step 5: वरून शेवया घाला. नीट मिक्स करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून नीट शिजवून घ्या.

Step 6: वरून मीठ आणि कोथिंबीर घाला. तुमचा उपमा तयार.

6)इन्स्टंट रवा डोसा (Instant Rawa Dosa Recipe)
रवा डोसा घरात बनवणं तसं तर अगदीच सोपं आहे. रवा भिजवून ठेवायचा असं तुम्हाला वाटत असेल तर तसं करायची गरज नाही. तुम्ही अगदी दहा मिनिट्समध्ये रवा डोसा करू शकाता. इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी काय करायचं बघूया. रव्यापासून अनेक पदार्थ तयार होतात. त्यापैकीच एक म्हणजे रवा डोसा

.

साहित्य
1 कप बारीक रवा
2 ½ कप पाणी
2 चमचे तांदळाचे पीठ
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
दही अथवा लिंबाचा रस
हिरव्या मिरचीचे तुकडे
हवे असल्यास, जिरे
बटर
तेल
इन्स्टंट रवा डोसा बनवण्याची पद्धत

Step 1: एका बाऊलमध्ये बारीक रवा घ्या.

Step 2: त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यात पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर चिरून घाला.

Step 3: दही अथवा लिंबाचा रस जे काही तुम्ही घेतले असेल ते मिक्स करा. मात्र दही अथवा लिंबाचा रस दोन लहान चमच्यांपेक्षा अधिक घालू नका.

Step 4: मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे हे सर्व त्यात मिक्स करून व्यवस्थित ढवळा. रवा पटकन तळाशी बसतो. त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

Step 5: पॅन गरम करा. डोसा करताना नेहमी काठ नसलेला पॅन वापरावा. जेणेकरून डोसा काढणे सहज शक्य होते. मंद आचेवर गॅस ठेवा. अन्यथा डोसा जळण्याची शक्यता असते.

Step 6: बॅटर पॅनवर टाकण्यापूर्वी ढवळून मगच टाकावे. हे बॅटर बऱ्यापैकी पातळसर असायला हवे. तरच त्याला व्यवस्थित जाळी येईल आणि पॅनवरूनही पटकन उकटेल.

Step 7: पॅनवर आधी तेल लावा आणि मग हे बॅटर टाका. ते टाकल्यानंतर व्यवस्थित शिजू द्या. डोशाची वरची बाजू परवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा. खाली डोसा ब्राऊन व्हायला लागल्यानंतर तो व्यवस्थित उकटत आहे की नाही हे एकदा पाहा.

Step 8: बाजूने तेल आणि बटर सोडा. त्यामुळे त्याला मस्त कुरकुरीतपणा येईल. हा व्यवस्थित शिजला की, चटणी अथवा सॉसबरोबर कुरकुरीत डोसा खायला द्या.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा