टोमॅटो ज्यूस – Marathi Recipes




प्रत्येकाच्या किचनमध्ये टोमॅटो हा असतोच. टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरतं आणि फॅट्सही वाढत नाहीत. तुम्ही टोमॅटोचं सेवन ज्यूस, सूप, सॅलड कोणत्याही प्रकारे करू शकता. आम्ही तुम्हाला सांगत आहोत टोमॅटोच्या ज्यूसचे फायदे. जर तुम्हाला लो किंवा बैचेन वाटत असेल तर टोमॅटो ज्यूस प्या. कारण टोमॅटोचा ज्यूस शरीराला उर्जा देतो. टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये पॉटेशिअम भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे टोमॅटोचा एक कप ज्यूसही फायदेशीर आहे. हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन गुणकारी असतं. पण हा ज्यूस घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. टोमॅटोचा ज्यूस फक्त मोठ्यांनाच नाहीतर लहानग्यांसाठीही फायदेशीर आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासात यामुळे मदत होते. याशिवाय मुलांच्या पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूसमध्ये काळीमिरी घालून दिल्यास फायदा होतो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ए आणि सी आढळतं, जे डोळ्यांची नजर वाढवण्यास मदत करतं. याशिवाय टोमॅटोमुळे डोळ्यांना होणारा रांताधळेपणाही कमी होतो. टोमॅटो मोतीबिंदूची वाढही रोखतो.
टोमॅटो ज्यूस कसा बनवावा (Recipe Of Tomato Juice)
आवश्यक साहित्य (Necessary Ingredients)
टोमॅटो – दोन पिकलेले
काळी मिरी – ¼ चमचा
मध – दोन चमचे
टोमॅटो ज्यूस बनवायची कृती (Method To Make)
1- सर्वात आधी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घ्या.
2- दुसरीकडे काळी मिरी कुटून किंवा वाटून त्याची पावडर करून घ्या.
3- आता टोमॅटो रस ग्लासात घेऊन त्यात काळी मिरी पावडर चांगली मिसळून घ्या.
4- आता या मिश्रणात दोन चमचे मध मिसळा.
5- तुमचा ज्यूस तयार आहे.
6- या ज्यूसचं सेवन आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच रोज सकाळी करा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड