बाळापूर किल्ला (Balapur Fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

बाळापूर किल्ला

हा किल्ला 1721 साली आझम खान याने बांधण्यास घेतला. आझम खान हा औरंगजेब याचा पुत्र होता. या किल्ल्याचं काम इस्माईल खान याने 1757 मध्ये पूर्ण केले. इस्माईल खान याला एलाईचपूरचा नवाब या नावाने ओळखलं जातं. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून या तटबंदीला जागोजागी बलदंड बुरूज बांधून संरक्षण करण्यात आले आहे. बाळापूर गावाच्या दक्षिणेकडील नदीच्या काठी मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री असून त्यांनी ही छत्री आपल्या घोड्याच्या आठवणीत बांधल्याचं म्हटलं जातं. बाळापूरच्या किल्ल्याला भेट देण्यास गेल्यास ही छत्री आवर्जून पहावी. या किल्ल्याला 29 ऑगस्ट 1992 या दिवशी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.विदर्भाला फारसा ऐतिहासिक वारसा लाभलेला नाही पण, जो काही आहे तो आजही त्याच स्तिथीत दिमाखात उभा आहे.अकोल्यापासून २५किमी वर मान व म्हैस नद्यांच्या संगमावर बाळापूर गाव वसलेले आहे. गावातील टेकडीवर असलेल्या बाळादेवीमुळे गावाचे नाव बाळापूर पडलेले. दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या टेकडीवर बाळापूरचा किल्ला आहे. मुगलांनी दगड आणि वीटांमध्ये बांधलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अजूनही शाबूत आहे.

औरंगजेबाचा मुलगा मिर्झा आझम शहा याने १७१७ मध्ये हा किल्ला बांधायला सुरुवात केली. १७५७ मध्ये अचलपूरचा नवाब इस्माईल खानने हा किल्ला बांधून पूर्ण केला. पुरंदरच्या तहाप्रमाणे युवराज संभाजी राजांना मुघलांचे पंचहजारी सरदार म्हणुन बाळापूर परगणा देण्यात आला होता. एस.टी स्टँड पासून २० मिनिटे चालत गेल्यावर दोन नद्यांच्या मधात असलेला किल्ला नजरेस पडतो. नदीच्या काठाने चालत समोर गेलो की उजव्या बाजूस नदी काठावर किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसतो. मन आणि म्हैस या बारमाही वाहाणार्‍या नद्या नाहीत. त्यामुळे नदीकडून होणाऱ्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी नदीच्या काठावर पहिला दरवाजा बांधला होता. किल्ला बांधला होता त्याकाळी दरवाजापासून चालू होणारी तटबंदी आणि बुरूज दुसऱ्या दरवाजा पर्यंत नेलेले होते. पहिला दरवाजा पाहून दुसऱ्या दरवाजाकडे जातांना तटबंदी बुरुजांचे अवशेष रस्त्याच्या डाव्या बाजूस पाहायला मिळतात. थोडासा चढ चढून आपण दुसऱ्या भव्य उत्तराभिमुख दरवाजापाशी येतो. रायगडच्या दरवाजाची आठवण करुन देणारा हा दरवाजा आहे. या दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे. पण हा मार्ग दगड लाऊन बंद केलेला आहे. दरवाजाच्या वरच्या बाजूस नगारखाना किंवा पाहारेकर्‍याना गस्त घालण्याची सोय असावी.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत. तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते. आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजुंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu