मसालेदार पालक फिश -Marathi Recipe




Spicy Spinach Fish – Marathi Recipe

साहित्य – 500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा हळद, 1/2 चमचा मसाला, 2 कप पालक, 1/2 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडे हिंग, मीठ चवीनुसार, 1 मोठा चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती -: सर्वप्रथम मासे स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे काप करावे. एका कटोर्‍यात लिंबाचा रस, हळद आणि मीठ घेऊन त्यात माशांचे तुकडे घालावे व चांगल्याप्रकारे एकजीव करावे. हे मिश्रण 1 तास तसेच ठेवावे. पालकाला स्वच्‍छ धुऊन चिरून घ्यावे. कांदा-लसणाची पेस्ट तयार करावी. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा- लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून शिजू द्यावे. नंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि पालक घालून 2-3 मिनिट शिजवावे. 5 मिनिटानंतर त्यात गरम मसाला, जिरे-धने पूड घालून परतून घ्यावे. त्यात पाणी घालून 5-7 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात माशांचे तुकडे व मीठ घालून शिजवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड