At the time of choosing a career, the post-graduation plays an important role. But since you do not have enough knowledge about the post-graduate courses, the youths, who go to traditional ways, go to traditional ways. That is why we need to know this. Read this article in marathi for making career option easy.
करिअर निवडते वेळी पदवी नंतरचेशिक्षण महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. परंतु पदवी नंतरच्या कोर्सेस विषयी आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने युवा, नाइलाजाने पारंपारिक वाटेनेच जातात. त्यासाठी हि माहिती असणे गरजेचे आहे.
बी.ए. ची पदवी घेतलेल्या विषयांमध्येच पदव्यत्तर शिक्षण घेता येते. शिवाय बी. एड., एम.बी.ए.,लॉ, हॉटेल म्यनेजमेंट, टुरिझम म्यनेजमेंट, हेही कोर्सेस तुम्ही करू शकता. फिल्म मेकिंग , मास कम्युनिकेशन, अएनिमेशन , फँशन ,ब्युटिशिअन यांसारखे डिप्लोमा कोर्सेसही करू शकता. एम ए इन सायकोलॉजी केल्यानंतर करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. इंग्रजी साहित्य, समाजशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र या विषयां मध्ये पोस्ट ग्रॉज्यूएशन करूनही करिअर करता येते. ऑर्किओलॉजी, फाइन आर्ट्स , परदेशी भाषा शिकून अनुवादकही होता येते.
बीकॉम नंतर तुम्ही बी एड , करू शकता पदवी नंतर एम कॉम, एमफिल, पी एच डी, करता करता नेट परीक्षा पास झाल्या नंतर लेक्चररशिप करता येऊ शकते. याशिवाय इन्कम टॅक्स ऑफिसर, सीएस, आयसीडब्ल्यूए, कॉस्ट अकाऊंटन्ट या सारखे कोर्स करता येऊ शकतात. याशिवाय तुम्ही बँक पी ओ, डिफेन्समधील परीक्षांची तयारी करू शकता. तसेच बीएस सी नंतर पुढे हि शिक्षण घेता येते. नोकरी करण्याचा पर्यायही निवडू शकता. अप्लाइड सायन्स मध्येही करिअरच्या अनेक संधी आहेत मात्र त्याची माहिती काढून ती संधी घेऊ शकता .