Money can become an addiction like anything else. It can control your life. And to be honest, it’s probably the only thing in our life that at times has become an obsession.There are plenty of reasons to save for a rainy day, especially if your income is low or average. If you don’t have a stable job but are paid commissions or bonuses or have a seasonal job, this is yet another reason to save to be financially independent. The unfortunate truth is that bad thing and emergencies can happen to everyone.
For more information read following article.
पैशाबाबत आसक्तीची भावना हि एक समस्यां होय. जीवनात पैसा भरपूर असावा हि भावना खरी परंतु त्याच बरोबर तो सत्य प्राप्त करण्यास सहाय्य भूत असावा हे महत्वाचे ठरते. आपण जर त्याला ध्येय मानले तर तो आपल्याला कधीच सहाय्य करू शकत नाही. त्याबद्दल आसक्ती निर्माण होते त्याच सोबत आपणातले योग्य, नवे,आणि सृजनात्मक विचार विसरायला लागतात. परंतु याच विचार सरणीची अत्यन्त गरज असते. हि विचार सरणी आपल्याला विसरून चालणार नाही. आपण जेवढा पैसा कमवितो त्या क्षमतेवर आपला विश्वास असला पाहिजे. योग्य मार्गाने पैसा कमविणारे लोक निश्चिन्त असतात. त्यांना पैशाची चणचण भासते तेव्हा नव्या कल्पना शोधण्याची स्वतःची क्षमता त्यांना माहित असते. कारण त्यांना समस्यां पैशाची नसून नव्या कल्पनेची आहे त्यावर त्यांचा विश्वास असतो. विचारांचे प्रशिक्षण आपली योग्यता वाढविते. (योग्यता वाढणे म्हणजे कोणतेही कला कौशल्य शिकणे, कम्प्युटर शिकणे, नवी भाषा शिकणे ,अशी किती तरी नावीन्य कला,व्यवहार शिकण्यासारखे असतात, कधी तरी कुठल्याही कार्य क्षेत्रात सेवा देता येतात. ) हे निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण करायला हवी.
नशीब अजमावण्या साठी सट्टा,जुगार,रेस ,लॉटरी हे तर फसवेगिरी व वेळ वाया घालविणे हाच प्रकार होय. आणि शेवटी पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही.
पैसा हे वरदान आहे त्याला अभिशाप बनवून चालणार नाही. पैसा असलातरी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. खर्चाचे अंदाजपत्रक असेल तर युक्तीचा आनंद मिळून ईशवराच्या रचनेचा हि आनंद मिळू शकतो. पैसा आपल्या जवळ येतो ती ईशवराची रचना होय. जशी सृष्टीची सर्वकार्य ठरल्याप्रमाणे चालतात. त्यामुळे आपली कार्य देवाण-घेवाण सहज -सुलभ होते हि एक विस्म्यजनक व्यवस्था आहे. हि सुलभ होण्यासाठी ईशवराने पैशाची निर्मिती केलेली आहे. हे भान असायला हवे तेव्हाच पैसा वरदान ठरेल. भान विसरलात तर तोच अभिशाप ठरतो.
पैसा जास्त आल्यास अहंकार येतो, त्याची शिक्षा कधी तरी मिळतेच.