Strategies for parents :
Learn and apply parenting strategies and behavior techniques through our expert articles including effective parenting, communication and calm parenting.
~ होऊ नका स्तुतिपाठक !
मुलांची स्तुती करणे हा पालकांचा नैसर्गिक धर्म. मुलाने एखादी चांगली कृती केली तर आपसूकच स्तुती केली जाते, पण सतत मुलांची स्तुती करणे योग्य नाही.
** मुलांची एक सारखी प्रसंसा करत राहिल्यास ते हि बाब गांभिर्याने घेईनासे होतात. अर्थातच त्यांच्यातील इच्छाशक्ती कमी होऊ शकते.
** आधी पालकांनी प्रसंसा करायची आणि मुलांना हर्भऱ्याच्या झाडावर चढवायचे आणि मग त्याने काम करायची पद्धत अयोग्य आहे यामुळे अपत्य प्रत्येक कामासाठी आई-वडिलांवर अवलंबुन राहील.
** सतत प्रसंसा करण्याची सवय असल्यास मुलांवरचा ताण वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. आपले प्रत्येक काम पालकांच्या प्रसंसेला प्राप्त ठरावे.हा ताण घेऊन वावरल्याने ते तणावग्रस्त अवस्था अनुभवतात.
** पालक स्तुतीपाठक असतील तर मुलं प्रत्येका कडून अशाच स्तुतीची अपेक्षा करीत असतात. अर्थात या वेळी भ्रमनिरासाचे दु;ख होण्याचा धोका असतो.
** सतत प्रसंसा करत राहिल्यास मुलांची नवे काही करण्याची इच्छाशक्ती कमी होत असल्याचेहि दिसून आलेले आहे.
मुलांना द्या बचतीचा कानमंत्र !
** बहुतांश लहान मुले हट्टीपणा करताना दिसतात. पण हट्टीपणा करण्याचे त्यांचे वयच असते, असा हि आपला समज असतो. मात्र या हट्टीपणाला चांगले वळण देणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. मुलांसाठी आवडती खेळणी घेण्यात पालकांना वेगळाच आनंद येतो.मात्र मुलं खेळण्यांसाठी जेव्हा सतत हट्ट करू लागले किंवा महागडी खेळणी मागू लागले तर अनेकदा पालकांसाठी ती बाब त्रासदायक ठरते.अशा वेळी पालकांनी मुलांना समजावून सांगणे फार गरजेचे असते.अनावश्यक खर्च टाळणे हि बाब मुलांच्या मनावर वेळीच बिंबव्हायला हवी. काही वेळी ते बिस्किट्स, चॉकलेट्स वरही बराच खर्च होत असतो. त्यावेळीच हे लक्षात येत नाही परंतु हे पुढे मुलांच्या आरोग्याला आणि पालकांनाही त्रासदायी ठरते. प्रत्येक वेळी बिस्किट्स आणि चॉकलेट्स आवश्यक असते हे गरजेचे नाही हे मुलांना वेळीच समजावून सांगणे फार आवश्यक आहे.
असा खर्च करण्याऐवजी मुलांना लहाणपणापासूनच बचतीची सवय लावायला हवी. त्यांना आपल्या जवळ फार रुपये येतात हे दर्शवणे गरजेचे नाही. मुलांना आपली आवक आटोक्याचीच दर्शवावी. हे पुढच्या समयासाठी फार आवश्यक आहे. पैशाचे महत्व त्यांना प्रेमाने समजावून सांगितले तर ते आवश्य समजतील. त्याचसाठी त्यांना लहान वयातच पैसे साठविण्याचे गल्ले किंवा मनीबँक वै आणून द्या. आजकाल बाजारात खेळणीच्या रूपात सुद्धा तर्हेतर्हेचे ब्यग्स किंवा ‘मनीबँक’ मिळतात. ते त्यांना पैसे साठविण्या करिता अवश्य घेऊन द्याव्यात. आणि आपण दिलेल्या पैशातून काही पैसे त्यांना मनीबँक मध्ये टाकण्यास सांगावे. आणि यातून तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू घेऊ शकाल हे पटवून दिलेत तर फारच उत्तम हे सांगणे तितकेच महत्वाचे ठरेल. यामुळे मुलांना बचतीची आपोआपच सवय लागेल.
हि रक्कम हळूहळू वाढली किं त्यांना त्याचा वेगळाच आनंद मिळतो. हा प्रयत्न केल्यास आपल्याला सुद्धा मुलांच्या चांगल्या सवयीचा आनंद मिळेल आणि फायदा सुद्धा होईल.